मुंबई – हवामान विभागाने १ जून रोजी मान्सूनचे आगमन केरळमध्ये होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होणार आहे. त्यानंतर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र तो दाखल होईल अशी शक्यताही व्यक्त केली आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन राजीवन यांनी ट्वीटमध्ये करत ही माहिती दिली आहे.
हा प्रारंभिक अंदाज आहे. त्यानंतर अधिकृत अंदाज हवामान विभाग १५ मे आणि ३१ मे रोजी वर्तवणार आहे. गेल्या दोन वर्षात मान्सून महाराष्ट्रात लांबला होता. त्यामुळे ही आनंदाजी बातमी हवामान विभागाने वर्तवली आहे. केरमध्ये मान्सून वेळेवर दाखल झाला तर तो महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होईल.
https://twitter.com/rajeevan61/status/1390171673857388545?s=20