माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- आज रविवार दि. ८ ते गुरुवार दि. १२ सप्टेंबर पर्यंतच्या पाच दिवसात महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर असे सहा जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सहा जिल्ह्यात केवळ तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
२- उर्वरित ३० जिल्ह्यापैकी रायगड मुंबई उपनगर ठाणे पालघर नंदुरबार धुळे जळगांव नाशिक छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली अशा १५ जिल्ह्यात एखाद्या दुसऱ्या दिवशी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
३- मान्सूनचा मुख्य आस हा सरासरीच्या दक्षिणेकडे असणार आहे हीच एक सध्या महाराष्ट्रातील पावसासाठी जमेची बाजू समजावी.