मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कुठे हलका मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस…बघा, हवामानतज्ञाचा अंदाज

by Gautam Sancheti
सप्टेंबर 4, 2024 | 12:02 am
in संमिश्र वार्ता
0
rain1


माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
….
१-मराठवाडा – हलका पाऊस
चंद्रपूर जवळ काल केंद्रित अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिमेकडे सरकल्यामुळे बुधवार ४ सप्टेंबर पासून मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड अश्या पाच जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होईल. तेथे केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ, हलक्या ते मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते. उर्वरित हिंगोली जालना व छत्रपती संभाजीनगर अशा तीन जिल्ह्यात बुधवार ४ ते मंगळवार १० सप्टेंबर पर्यंत आठवडाभर मात्र मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहे.

२-मुंबईसह कोकण – अति जोरदार पाऊस
मान्सूनचा मुख्य आस काहीसा दक्षिणेकडे सरकलला आहे. अरबी समुद्रात संपूर्ण पश्चिम किनारपट्टी समांतर दक्षिणोत्तर ‘ ऑफ-शोअर ट्रफ ‘ ची उपस्थिती आहे. तसेच अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून दिड किमी उंचीपर्यंत ताशी ४८ किमी वेगाचे येणारे आर्द्रतायुक्त पश्चिमी वारे, वेग कमी होवून प्रत्यक्षात ताशी २०-२५ किमी वेगाने मुंबई किनारपट्टीवर आदळत आहे. या सर्वांच्या एकत्रित परिणामातून मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात मंगळवार ३ सप्टेंबर ते मंगळवार १० सप्टेंबर पर्यंत आठवडाभर अतिजोरदार पावसाची शक्यता ही कायम टिकून आहे.

३-मध्य महाराष्ट्र व विदर्भ – मध्यम ते जोरदार पाऊस
मंगळवार ३ ते मंगळवार १० सप्टेंबर पर्यंत आठवडाभर खान्देश, विदर्भ आणि नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा २१ जिल्हात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही कायमच आहे.

४-सह्याद्री कुशीतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील पावसाचा जोर पाहता आज मंगळवार ३ ते मंगळवार १० सप्टेंबर पर्यंत आठवडाभर धरणांतून होत असलेला जलविसर्ग असाच टिकून राहू शकतो, किंवा त्यात अधिक वाढही होवु शकते.त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावर पूर-परिस्थितीची शक्यता ही कायम राहील, असे वाटते.

५-विदर्भ वगळता महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ डिग्रीने खालावून २८ डिग्री से. ग्रेडच्या आसपास आहे. तर पहाटेचे किमान तापमानही सध्या सरासरीइतके म्हणजे २२ डिग्री से. ग्रेडच्या आसपास जाणवते आहे.ह्या कमाल व किमान अशा दोन्ही तापमानातील फरक कमी कमी होत, ६ डिग्री से.ग्रेड पर्यन्त खालावला आहे. त्यामुळे सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारीही सरासरीपेक्षा वाढतीकडे झेपावत आहे. प्रचंड अश्या ह्या होणाऱ्या आर्द्रतेच्या उपलब्धतेतून आणि फक्त कमाल तापमानातील विशेष अश्या घसरणीमुळे, येथे-तेथे पडणाऱ्या उष्णता संवहनी प्रक्रियेच्या पावसास सध्याचे वातावरण मारक ठरून, व्यापक क्षेत्र कव्हर करणाऱ्या मान्सूनच्या पावसाला पूरक ठरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या तश्याच प्रकारचा व्यापक क्षेत्र कव्हर करणारा दमदार पावसाचा लाभ होत आहे.

६- आज पासून दोन दिवसानंतर म्हणजे गुरुवार ५ सप्टेंबरला बंगाल उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असुन सप्टेंबर मधील सध्याच्या पावसाच्या आवर्तनासाठी पूरक ठरेल. अ. क्रं. २, ५ व ६ मधील माहिती इच्छुक शेतकऱ्यांचे प्रबोधन व त्यांच्या ह. साक्षरतेसाठीच दिली आहे, असे समजावे, ही विनंती.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उद्योगांसाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी अमृत आणि आयजीटीआर यांच्यात सामंजस्य करार

Next Post

चोरलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातून महिलेच्या बॅक खात्यावर डल्ला…इतके पैसे परस्पर काढून घेतले

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
atm

चोरलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातून महिलेच्या बॅक खात्यावर डल्ला…इतके पैसे परस्पर काढून घेतले

ताज्या बातम्या

image0012G82

बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किमी लांबीच्या समुद्राखालच्या बोगद्याचा पहिला भाग खुला…ही कामे झाली पूर्ण

जुलै 15, 2025
विधानसभा लक्षवेधी ३ 2 1 1024x512 1

गिरणा उपखोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्याबाबत विधानसभेत लक्षवेधी….

जुलै 15, 2025
संग्रहित फोटो

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांच्या कामाबाबत विधानसभेत लक्षवेधी…झाला हा निर्णय

जुलै 15, 2025
income tax1

कपात आणि सवलतीचे बोगस दावे करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई

जुलै 15, 2025
bjp11

नाशिकमधील या दोन नेत्यांचा रखडलेला भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा…तक्रारदाराने घेतली तक्रार मागे

जुलै 15, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेच्या ७४ गटांचा प्रारूप आराखडा जाहीर….हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत

जुलै 15, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011