माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१-उद्या मंगळवार दि. २७ ते शुक्रवार दि. ३० ऑगस्ट पर्यंतच्या चार दिवसात, नांदेड वगळता मराठवाडा, नगर, पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर, सोलापूर, अशा १३ जिल्ह्यात हळूहळू पावसाचा जोर कमी होऊन दुपारी ३ वाजेच्या कमाल तापमान वाढ व हळूहळू उन्हाची ताप वाढण्याची शक्यता जाणवते. वरील १३ जिल्ह्यात दुपारनंतर सायंकाळी झालाच तर तुरळक ठिकाणी केवळ गडगडाटी स्वरूपातील मध्यम पावसाची शक्यता असू शकते.
२-मात्र, दरम्यानच्या चार दिवसात, मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ खान्देश तसेच नाशिक व नांदेड अशा २३ जिल्ह्यात, सध्या चालु असलेल्या पावसाचा जोर असाच राहू शकतो.
३-कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य पाहता रविवार दि. २५ ऑगस्टपासून सह्याद्री कुशीतील नाशिक,पुणे,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून होत असलेला जलविसर्ग असाच टिकून राहू शकतो. त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावर पूर-परिस्थितीची शक्यता ही कायम आहे.
४-शनिवार दि.३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंतच्या सहा दिवसात संपूर्ण विदर्भ, खान्देश, नाशिक व मुंबई अश्या १६ जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस जोर पकडण्याची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.