माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
।।।।
१- उघडीप –
संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक अ.नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यांत आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार ११ सप्टेंबर पर्यंत पावसाची काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात व विदर्भात मात्र ही उघडीप परवा मंगळवार ९ सप्टेंबरपासुन जाणवेल, असे वाटते.
२-पुन्हा पाऊस-
मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाडा वगळता उर्वरित संपूर्ण विदर्भ,खान्देश व नाशिक अ.नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या २१ जिल्ह्यांत शुक्रवार दि.१२ सप्टेंबरपासुन मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील १५ जिल्ह्यात मात्र ह्या दिवसात केवळ तुरळक ठिकाणी मध्यमच पावसाची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.