माणिकराव खूळे, हवामानतज्ञ
रविवार सकाळ ते सोमवार २६ ऑगस्टच्या सकाळ पर्यंतच्या ४८ तासात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता ही आहेच. विशेषतः नंदुरबार धुळे, जळगांव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा १४ जिल्ह्यात या ४८ तासात तर अतिजोरदार पावसाचीही शक्यता जाणवते.
रविवार २५ ऑगस्टपासून सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून होणाऱ्या जलविसर्गाच्या शक्यतेतून, संबंधित नद्यांच्या खोऱ्यात कदाचित पूर-परिस्थितीही निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.