सोमवार, ऑगस्ट 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यात आठवडाभर पावसाची असेल ही स्थिती, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

by Gautam Sancheti
जुलै 21, 2025 | 7:34 am
in संमिश्र वार्ता
0
rain1

माणिकराव खूळे, हवामानतज्ञ
…
१-मध्यम ते जोरदार पाऊस –
सोमवार २१ जुलै( लहान एकादशी) पासून आठवडाभर म्हणजे पहिला श्रावणी सोमवार २८ जुलैपर्यंत महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण(विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड अश्या ३ जिल्ह्यात), संपूर्ण विदर्भ(विशेषतः अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अश्या ८ जिल्ह्यात) तसेच
नाशिक अ.नगर पुणे सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पेठ त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी जुन्नर लोणावळा खंडाळा मावळ मुळशी वेल्हे भोर महाबळेश्वर जावळी पाटण शाहूवाडी बावडा राधानगरी चांदगड तालुक्याच्या क्षेत्रात व लगतच्या परिसरात तसेच नंदुरबार जळगांव धुळे कोल्हापूर सांगली सोलापूर व मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड परभणी अश्या १० जिल्ह्यात म्हणजेच एकूण बत्तीस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

२- आता तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस-
मराठवाड्यातील छ.सं.नगर जालना बीड हिंगोली जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील घाटा खालील वर्षच्छायेच्या प्रदेशातील नाशिक अ.नगर पुणे सातारा जिल्ह्यातील तालुक्यात २१ ते २८ जुलैच्या आठवड्यात मात्र केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

३- जुलै महिन्याचा अंदाज व सध्यस्थिती-
११ ते २४ जुलै दरम्यानच्या दोन आठवड्यात कोकण व विदर्भ वगळता संपूर्ण खान्देश, मध्य- महाराष्ट्र व मराठवाडा अश्या एकूण १८ जिल्ह्यात अंदाजानुसार तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस वजा जाता उघडीपच जाणवत आहे. परंतु त्याच्या तीन दिवस अगोदरच म्हणजे उद्या सोमवार दि २१ जुलै पासुन पावसाचे वातावरण होत आहे. जुलै महिन्यात, महाराष्ट्रासाठी, सरासरीपेक्षा अधिक असा व्यक्त केलेल्या मासिक पावसाचा अंदाजाची पूर्तता, येणाऱ्या १० दिवसातील, मध्यम ते जोरदार पावसामुळे होण्याची शक्यता जाणवते.

४-नद्यांच्या खोऱ्यातील जल आवक व धरणे संचय साठा स्थिती-
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील गोदावरी गिरणा वैतरणा कश्यपी कडवा प्रवरा,भीमा नीरा इंद्रायणी मुळा मुठा कुकडी कृष्णा-कोयना, पंचगंगा वारणा दूधगंगा भोगावती नद्यांच्या खोऱ्यात मात्र मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे ह्या नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गासह, धरणांच्या जलसाठ्याच्या टक्केवारीतही ह्या २१ ते २८ जुलैच्या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे नजीकच्या काळात जायकवाडी धरणही त्याच्या शतकी जलसाठ्याकडे झेपवण्याची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी अतिश्रम टाळून तब्येतीकडे लक्ष ठेवावे, जाणून घ्या, सोमवार, २१ जुलैचे राशिभविष्य

Next Post

महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही…रोहिणी खडसे यांची पोस्ट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 43

महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही…रोहिणी खडसे यांची पोस्ट

ताज्या बातम्या

IMG 20250817 WA0031

क्रेडाईच्या गृह प्रदर्शनास मोठा प्रतिसाद…आज शेवटचा दिवस

ऑगस्ट 18, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या जिल्ह्यात १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता….

ऑगस्ट 18, 2025
Gyj9FwXXMAAG8KV

भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावाची केली घोषणा…

ऑगस्ट 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 17, 2025
Untitled 31

निरोप समारंभादरम्यान गाणे सादर करणे तहसीलदाराला पडले महागात,तत्काळ निलंबित करण्याचे आदेश…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

TAIT..शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा उद्या निकाल

ऑगस्ट 17, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011