माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
….
१-मान्सून ची प्रगती –
संपूर्ण उत्तर भारतात मान्सून त्याच्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे म्हणजे त्याचे सरासरी तारखेचे सातत्य ठेवून सध्या बरोबर पुढे झेपावत आहे. सध्या देशाचा साधारण ८५ टक्के भाग मान्सून ने व्यापला असुन पुढील १५ दिवसात कदाचित तो संपूर्ण देश काबीज करण्याची शक्यता जाणवते.गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीत मान्सून जबरदस्तपणे कोसळत आहे. कोकण किनारपट्टीप्रमाणे संपूर्ण गुजराथ व मध्यप्रदेशातही मान्सून सेट झाला आहे. त्याच्या प्रेरित परिणामातूनच महाराष्ट्रातील खान्देश-नाशिक सह मध्य महाराष्ट्रात मान्सून-पावसाच्या आशा काहींशा पल्लवीत झाल्या आहे,
२-मध्य महाराष्ट्रातील पाऊस-
आजपासुन पुढील सात दिवस म्हणजे शनिवार २८ जून पर्यन्त नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सह मराठवाड्यातील छ.सं.नगर व जालना जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.ह्या जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मात्र जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
३-मराठवाड्यातील पाऊस !
छ.सं.नगर, जालना असे दोन जिल्हे वगळता बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात पुढील १० दिवस म्हणजे मंगळवार दि.१ जुलैपर्यन्त केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
४-विदर्भातील पाऊस-
मंगळवार दि. २४ जून पासुन पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार दि.२८ जून पर्यन्त विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.उर्वरित वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मात्र मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
५-कोकणातील पाऊस-
मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील १० दिवस म्हणजे मंगळवार दि.१ जुलैपर्यन्त जूनपर्यंत सध्या जाणवतो तसा जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहे.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.