माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
….
१-मध्य महाराष्ट्र –
दोन दिवस मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छ. सं.नगर जिल्ह्यात या पहाळे टाईप पावसाची शक्यता या दोन दिवसात जाणवेल. खान्देशात मात्र हे वातावरण टिकून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परवा शनिवार २१ ते २८ जूनपर्यंतच्या आठवड्यात पुन्हा ढगाळ वातावरण राहून किरकोळच पावसाची शक्यता जाणवते.
२-कोकण-
मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्हे तसेच सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील जिल्ह्यात पुढील १० दिवस म्हणजे शनिवार २८ जूनपर्यंत सध्या जाणवतो तसा जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहे.
३- विदर्भ
विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे शनिवार दि. २१ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असुन त्यानंतर आठवडाभर मात्र पुन्हा तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
४- मराठवाडा-
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मात्र पुढील १० दिवस केवळ ढगाळ वातावरण राहूनअगदीच तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे, हवामानतज्ञ