सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

by India Darpan
जून 16, 2025 | 6:48 pm
in संमिश्र वार्ता
0
rain1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर १६ जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या २४ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते.

१ जून ते १६ जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या २२ टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १ टक्का कमी, मराठवाड्यात २६ टक्के कमी, आणि विदर्भात ६१ टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील १३४ तालुक्यांमध्ये एकूण पाऊस ६५ मिलीमीटर हून अधिक पडला आहे आणि ८४ तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे.

२२ जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये २२ तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही.

अद्यापि ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

Next Post

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

Next Post
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011