माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
…
१-गुरुवार दिनांक १२ जून पासून पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवार दि. १२ ते सोमवार दि. १६ जून अश्या पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यातही शनिवार दि. १४ ते सोमवार दि. १६ जून ह्या तीन दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, मराठवाडा तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या जिल्ह्यात मध्यम जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अशा १३ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता अधिक जाणवते. विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
२-सध्या काही शेतकरी धूळ पेरणीचा विचारात असून त्यांनी मान्सून सक्रिय झाल्यावर, १५ जून नंतर, चांगल्या मान्सून पावसाची ओल, उत्तम वाफसा आणि स्वतःच्या विवेकावर पेरणीचा निर्णय घ्यावा, असे वाटते. परंतु त्यातही ज्यांच्याकडे बक्कळ ओल व सिंचनाची व्यवस्था आहे, अश्या शेतकऱ्यांनी एक दोन दिवसात स्वतः च्या हिमतीवर पेरणीचा निर्णय करावा, असे वाटते.ज्यांनी मे महिन्याच्या बे- मोसमी पावसावर गेल्या ८-१० दिवसापूर्वी पेरण्या केल्या असतील अश्या शेतकऱ्यांनीही घाबरू नये. असे वाटते.
ReplyForwardYou can’t react with an emoji to a group |