माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
….
१- जोर ओसरणार –
२९ मे ते मंगळवार३ जून दरम्यानच्या ५-६ दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित महाष्ट्रातील २९ जिल्ह्यात पूर्णतः नसला तरी पावसाचा जोर हळूहळू काहीसा ओसरू लागेल, असे वाटते. मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर सोमवार २ जूनपर्यंत कायम जाणवतो.
२- पावसाचा खण्ड नव्हे पण उघडीप मिळणार-
शुक्रवार ३० मे ते १० जून ते मंगळवार १० जून दरम्यानच्या १०-१२ दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित महाष्ट्रातील २९ जिल्ह्यात, मान्सूनच्या त्याच्या पुढील वाटचालीला बाधा न येता, ज्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला. त्याठिकाणी, वाफस्यावर पेर-पूर्व मशागत, व खरीप पेरणीसाठी पावसाची काहीशी उघडीप मिळून, शेतकामासाठी सापड मिळू शकते, असे वाटते.
३-मान्सून ची सध्य:स्थिती-
दोन दिवसापूर्वी पुण्या-मुंबईत पोहोचलेला मान्सून, सध्या त्याच्या वाटचालीत वातावरण अनुकूल असल्यामुळे तो आज नगर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यात तर व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचला आहे.पालघर नाशिक खान्देश छ.सं.नगर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्याकडे त्याने अजुन झेप घेतलेली नाही.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.