माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
विदर्भ वगळता, मुंबई कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्रात रविवार दि. २५ ऑगस्ट पर्यंत मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते. मराठवाड्यात मात्र पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार २२ ऑगस्ट पर्यंतच मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यानंतर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र आजपासूनच संपूर्ण आठवडा. म्हणजे रविवार २५ ऑगस्ट पर्यंत जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
२-वाढलेली उन्हाची ताप अजूनही कायम जाणवू शकते. संपूर्ण महाराष्ट्रात पुढील ३ दिवस म्हणजे मंगळवार १९ ऑगस्टपर्यन्त दुपारचे ३ चे कमाल तापमान हे ३२ डिग्री से.ग्रेडच्या आसपास म्हणजे सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ६ डिग्री से.ग्रेडने अधिक जाणवू शकते. विशेषतः संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जालना बीड धाराशिव अशा २१ जिल्ह्यात तर हे तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ डिग्रीने अधिक जाणवेल. उर्वरित मराठवाडा व संपूर्ण विदर्भातील १५ जिल्ह्यात हे तापमान २ ते ३ डिग्रीने अधिक जाणवेल. मुंबई रायगड ठाणे पालघर रत्नागिरी, नगर, पुणे, सातारा या ८ जिल्ह्यात उन्हाची काहिली अधिक जाणवणार.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.