माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- गुरुवार २४ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप मिळू शकते, असे वाटते
२-परंतु शनिवार दि. २६ ते मंगळवार दि. २९ ऑक्टोबरपर्यंतच्या चार दिवसात दक्षिण नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता जाणवते.
३- मुंबईत मात्र आज व उद्या (२१-२२ ला ) जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.
४- एक नोव्हेंबर नंतर पावसाची पूर्णतः उघडीप मिळू शकते, असे वाटते.
५-थायलंडच्या पश्चिम किनारपट्टीसमोर व अंदमान बेटांच्या उत्तरेला, बं. उपसागरात आज तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राचे, उद्या (२२ ला) तीव्र कमी दाब क्षेत्रात तर परवा (२३ ला) चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता जाणवते. गुरुवार २४ ऑक्टोबरला ओरिसा व पश्चिम बंगाल किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राला या चक्रीवादळापासून कोणताही धोका नाही.
त्यामुळे मीडियात ह्याबाबत जो डांगोरा पिटवला जात आहे, त्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करावे, असे वाटते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.