शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता…बघा, हवामान तज्ञांचा अंदाज

by India Darpan
ऑक्टोबर 8, 2024 | 5:14 pm
in संमिश्र वार्ता
0
rain1

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
….
१- ऑक्टोबर आवर्तनातील पाऊस -उद्या बुधवार ९ ते रविवार दि.१३ ऑक्टोबर पर्यंतच्या पाच दिवसाच्या पूर्वघोषित पहिल्या आवर्तनातही संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः बुधवार व गुरुवार ९ व १० ऑक्टोबरला दोन दिवस संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात तर गुरुवार शुक्रवार १० व ११ ऑक्टोबरला दोन दिवस, खांदेश, नाशिक, ,पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १० जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाडा क्षेत्रात मात्र तुरळक ठिकाणी गडगडाटीसह
केवळ किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

२-परतीचा पाऊस जाग्यावरच-गेल्या ४ दिवसापासून नंदुरबारमध्ये खिळलेला परतीचा पाऊस येत्या २-३ दिवसात म्हणजे १० ऑक्टोंबर दरम्यान कदाचित तो महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करण्याची शक्यता जाणवते.

३- कडक खपलीचा पाऊस – ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यानच्या ह्या पाच दिवसाच्या आवर्तनात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण फारसे नसले तरी हा पाऊस धोपटणी स्वरूपाचा व जमिनीला जाड कडक खपली आणणारा पाऊस असु शकतो.

४-पावसाचा शेत पिकावर परिणाम– झोडपणी पावसामुळे फ्लॉवरिंग मधील द्राक्षे बागांची फुल-झड व पोंग्यातील बागांच्या कोंबांना इजा पोहोचू शकते. विशेषतः सध्या नुकतीच आगाप पेर झालेल्या हरबरा, किंवा उभे असलेले लाल कांद्याची रोपे, तसेच आगाप टाकलेले व उगवणीच्या स्थितीत असलेले उन्हाळ गावठीची रोपे ह्यांना ह्या पावसामुळे बाधा होऊ शकते.

५-कांदा रोप टाकणी -नवीन उन्हाळ गावठी हुळं टाकणाऱ्यांनी शक्यतो १२ ते १३ ऑक्टोबर नंतरच टाकावे, असे वाटते. कारण १३ ऑक्टोबर नंतर जरी किरकोळ पाऊस झाला तरी हुळं उताराला विशेष अपायकराकता जाणवणार नाही, असे वाटते. अर्थात शेवटी निर्णय शेतकऱ्यांनी स्वतःच घ्यावा,

६-कोकण व मराठवाड्यातील पाऊस –अर्थात कोकण व मराठवाडा क्षेत्रात पडणारा पाऊस हा आज मितीला किरकोळ स्वरूपाचाच जाणवतो.

७-ऑक्टोबर दुसऱ्या पंधरवड्यातील पाऊस- कोजागिरी पौर्णिमा ते नरक चतुर्दशी(बुधवार दि.१५ ते गुरुवार दि.३१ ऑक्टोबर) दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून वीज व गडगडाटीसह केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

८-नोव्हेंबर चा पाऊस –ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील पावसाच्या दुसऱ्या आवर्तनात म्हणजे २२ ते २६ ऑक्टोबर पाच दिवसादरम्यान पावसाची शक्यता वाढली आहे. हे आवर्तन कदाचित नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही टिकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण…नाशिक जिल्ह्यातील ६ संस्थांचे आता हे नाव

Next Post

दारूबंदी सप्ताह…राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात सव्वासतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Next Post
daru 1

दारूबंदी सप्ताह…राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात सव्वासतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011