सोमवार, जुलै 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रेल्वेने केली आजपासून भाडेवाढ…मेल, एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्यांमध्ये लागू

by Gautam Sancheti
जुलै 1, 2025 | 7:55 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शुल्करचनेमध्ये सुरळीतता आणण्याच्या तसेच प्रवासी सेवेतील वित्तीय शाश्वतता सुधारण्याच्या उद्देशाने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे सेवेच्या मुलभूत शुल्काचे सुयोजन केले आहे. हे बदल आज पासून लागू होणार आहेत. सुधारित प्रवास शुल्क भारतीय रेल्वे विचारविनिमय संघटनेने (आयसीआरए) जारी केलेल्या अद्ययावत प्रवास शुल्क तक्त्यावर आधारित आहे.

प्रवास भाडे सुयोजनाची ठळक वैशिष्ट्ये (1 जुलै 2025 पासून लागू):
उपनगरीय एक दिशा प्रवासी भाडे आणि सिझन तिकिटांच्या (पास) भाड्यामध्ये (उपनगरी आणि बिगर उपनगरी मार्गांवरील) कोणताही बदल केलेला नाही.

सामान्य बिगर-वातानुकूलित वर्गांसाठी (बिगर-उपनगरी रेल्वेगाड्या):
दुसरा वर्ग : खालील संदर्भात प्रत्येक किमी अंतरामागे अर्धा पैशाची वाढ
500 किमी पर्यंत शुल्कात कोणतीही वाढ नाही
501 ते 1500 किमीच्या प्रवासासाठी 5 रुपये भाडेवाढ
1501 ते 2500 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी 10 रुपयांची भाडेवाढ
2501 ते 3000 किमीच्या टप्प्यातील प्रवासासाठी 15 रुपयांची भाडेवाढ
शयनयान वर्ग : प्रत्येक किमी अंतरामागे अर्धा पैशाची वाढ
प्रथम वर्ग : प्रत्येक किमी अंतरामागे अर्धा पैशाची वाढ
मेल/एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांसाठी (बिगर-वातानुकूलित):

दुसरा वर्ग: प्रत्येक किमी अंतरामागे एका पैशाची भाडेवाढ
शयनयान वर्ग: प्रत्येक किमी अंतरामागे एका पैशाची भाडेवाढ
थम वर्ग: प्रत्येक किमी अंतरामागे एका पैशाची भाडेवाढ

वातानुकुलीत (एसी)वर्गांसाठी (मेल/एक्स्प्रेस रेल्वे गाड्या):
एसी चेयर कार, एसी 3-टायर/3-इकॉनॉमी आणि एसी पहिला/एक्झीक्युटीव्ह वर्ग/एक्झीक्युटीव्ह अनुभूती: प्रत्येक किमी अंतरामागे दोन पैशांची भाडेवाढ.
भाडेशुल्कात करण्यात आलेले हे बदल राजधानी, शताब्दी, दुरांतो,वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत, महामना, गतिमान, अंत्योदय, जन शताब्दी, युवा एक्स्प्रेस, एसी व्हिस्टाडोम, अनुभूती कोचेस तसेच सामान्य बिगर-उपनगरी सेवा अशा प्रमुख आणि विशेष रेल्वे सेवांसाठी देखील सुधारित वर्ग-निहाय शुल्करचनेनुसार लागू होणार आहेत.

पूरक शुल्कांमध्ये कोणताही बदल नाही:
आरक्षण शुल्क, अतिवेगवान गाड्यांसाठी द्यावे लागणारे अधिभार तसेच इतर सर्व प्रकारच्या शुल्कांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
लागू असलेल्या नियमांनुसार जीएसटी आकारण्यात येईल.
शुल्क गोळाबेरीजविषयक तत्वे विद्यमान नियमांनुसार लागू होतील.

अंमलबजावणी
सुधारित शुल्क 01 जुलै 2025 रोजी अथवा त्यानंतर खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू आहे. या तारखेपूर्वी जारी केलेली तिकिटे कोणत्याही शुल्क समायोजनाशिवाय, विद्यमान शुल्कासह वैध असतील. पीआरएस, युटीएस आणि प्रत्यक्ष तिकीट खरेदी प्रणाली नव्या सुधारणेनुसार अद्ययावत करण्यात येत आहेत.सुधारित शुल्क रचनेच्या सुरळीत अंमलबजावणीच्या सुनिश्चितीसाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागीय रेल्वे परिमंडळांसाठी आवश्यक सूचना जारी केल्या असून विभागीय रेल्वे परिमंडळांना अद्ययावत शुल्काची माहिती सर्व स्थानकांवर प्रदर्शित करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा ‘ईव्ही’ कारमधून विधानभवनापर्यंत प्रवास…दिला हा संदेश

Next Post

माजी आमदार अपूर्व हिरे यांचा २ जुलैला समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled

माजी आमदार अपूर्व हिरे यांचा २ जुलैला समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा, जाणून घ्या, मंगळवार, २९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 28, 2025
दिव्या देशमुख 1024x683 1

विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

जुलै 28, 2025
Gw8rNZMbAAAUjVA

मराठमोळ्या दिव्या देशमुखला बुद्धिबळाच्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद…पंतप्रधान व राज ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

जुलै 28, 2025
IMG 20250728 WA0321 1

कांदादराच्या वाढीसंदर्भात लासलगाव येथे महत्त्वपूर्ण बैठक…हे ठराव झाले पारित

जुलै 28, 2025
Untitled 55

शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट…अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार प्रकरणाची पत्राव्दारे दिली माहिती

जुलै 28, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरुच…वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये अडीच लाखाचा ऐवज चोरीला

जुलै 28, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011