नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पारदर्शकता, सुरक्षितता आणि सहजपणे वापर वाढवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, भारतीय रेल्वेने त्यांच्या तिकीट आरक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये व्यापक स्तरावर डिजिटल सुधारणा केली आहे.अत्याधुनिक अँटी-बीओटी प्रणाली कार्यान्वित करत तसेच आघाडीच्या कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क (सीडीएन) सेवा प्रदात्याशी जोडत, रेल्वेने अनधिकृत एजंटांकडून होणाऱ्या अनधिकृत स्वयंचलित बुकिंगला लक्षणीयरीत्या आळा घातला आहे आणि खऱ्या वापरकर्त्यांसाठी संकेतस्थळात प्रवेश करण्याचा मार्ग सुधारला आहे.
नवीन प्रणालीमुळे सर्व बॉट ट्रॅफिक प्रभावीपणे कमी झाले आहेत, जे तत्काळ आरक्षणाच्या पहिल्या पाच मिनिटांत सर्वाधिक होत असे. या कालावधीत एकूण लॉगिन प्रयत्नांपैकी बॉट ट्रॅफिकचा वाटा 50% पर्यंत असतो. ही वाढ खऱ्या वापरकर्त्यांसाठी चांगली प्रवेशयोग्यता सुनिश्चित करते.याचा परिणाम म्हणून, तिकिटे बुक करण्यासाठी 2.5 कोटी संशयित वापरकर्त्यांची ओळख (आयडी) निष्क्रीय करण्यात आली आहे. 22 मे 2025, रोजी रेल्वे आरक्षणाने विक्रमी कामगिरी नोंदवली, ज्यामध्ये प्रति मिनिट सर्वाधिक 31,814 तिकिटे बुक केली गेली, जी या अद्ययावत केलेल्या प्लॅटफॉर्म यंत्रणेचे सबलीकरण आणि तुलना दर्शवते.
समानता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी, नवीन वापरकर्ता आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. आधारकार्डाद्वारे प्रमाणित नसलेले वापरकर्ते देखील नोंदणीच्या 3 दिवसांनंतरच ओपनिंग एआरपी, तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळ तिकिटे बुक करू शकतात, तर आधार-सत्यापित वापरकर्ते विलंब न करता त्वरित तिकिटे आरक्षित करू शकतात.
या प्रयत्नांमुळे लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. सरासरी दैनिक वापरकर्ता लॉगिन आर्थिक वर्ष 2023–24 मधील 69.08 लाखांवरून आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये 82.57 लाख झाले आहेत, जी 19.53% वाढ नोंदवते, तर त्याच कालावधीत सरासरी दैनिक तिकीट आरक्षण 11.85% वाढले. याव्यतिरिक्त एकूण आरक्षित तिकीट बुकिंगपैकी, ई-तिकीटिंग आता 86.38% आहे.
अद्ययावतीकरणात पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:
वेगवान गतीने लोड करण्याच्या वेळा आणि कमी सर्व्हर लोडसाठी CDN द्वारे 87% स्थिर सामग्री दिली जात आहे
अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)अल्गोरिदम वापरून बॉट ट्रॅफिकचा सक्रिय शोध घेणे आणि कमी करणे शक्य झाले आहे
सायबर क्राइम पोर्टलद्वारे संशयास्पद वापरकर्ता आयडी सक्रियपणे निष्क्रिय करणे
आयआरसीटीसीच्या माध्यमातून भारतीय रेल्वे एक अखंड, सुरक्षित आणि वापरकर्ता-अनुकूल तिकीट आरक्षणाचा अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे. देशभरातील लाखो प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि समान प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी सतत नावीन्याचा शोध घेत त्याच्या आधुनिकीकरण केंद्रस्थानी राहील.