नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वेचा प्रवास सुखकर मानला जातो, परंतु सध्याच्या परिस्थितीत यासाठी ॲडव्हान्स बुकिंग करावे लागते. परंतु काही वेळा बुकिंग केल्यानंतर आपण काही कारणास्तव प्रवास रद्द करावा लागतो. त्यामुळे पैसे परत मिळविण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. मात्र आता तसे होणार नाही ? कारण भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेक वेळा असे घडते की, आरक्षणाचा तक्ता तयार केल्यानंतर आपत्कालीन स्थितीत तिकीट रद्द केले जाते. या परिस्थितीत प्रवाशांचे तिकिटाचे पैसे परत केले जाऊ शकतात. IRCTC ने तुम्हाला तिकिटावर परतावा कसा मिळेल याची माहिती दिली आहे. जर तुमच्या बाबतीत असे घडले तर आपण परतावा मागू शकता.
विशेष म्हणजे IRCTCने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे व माहिती दिली आहे की, भारतीय रेल्वे प्रवास न केलेल्या तिकिटांवर आणि अर्धवट प्रवास केलेल्या तिकिटांवर परतावा देते. मात्र यासाठी प्रवाशांना रेल्वेच्या नियमानुसार तिकीट जमा पावती (टीडीआर) सादर करावी लागते. यासाठी प्रथम भारतीय रेल्वेच्या irctc.co.in या वेबसाइटवर जावे लागेल.
– आता होमपेजवर My Account हा पर्याय निवडा.
– आता ड्रॉप डाउन मेनूवर जा आणि My transaction वर क्लिक करा.
– येथे तुम्ही फाइल टीडीआर पर्यायातील कोणताही एक निवडून टीडीआर फाइल करू शकता.
– आता तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती दिसेल, ज्याच्या नावावर तिकीट बुक केले आहे.
– आता येथे तुमचा पीएनआर क्रमांक, ट्रेन क्रमांक आणि योग्य माहिती भरा आणि रद्द करण्याच्या नियमांच्या बॉक्सवर टिक करा.
– आता तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करा, त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर OTP पाठवला जाईल.
– त्यानंतर OTP टाका आणि PNR तपशील येथे टाका आणि तिकीट रद्द करा पर्यायावर क्लिक करा.
– आता येथे तुम्हाला पृष्ठावर परताव्याची रक्कम म्हणजेच परतावा दिसेल.
– बुकिंग फॉर्मवर दिलेल्या क्रमांकावर, तुम्हाला PNR आणि परताव्याच्या तपशीलांसह एक पुष्टीकरण संदेश मिळेल.