पुणे – भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटले जाते. देशातील विविध भागात प्रवास करण्यासाठी कोट्यवधी लोक दररोज रेल्वेचा उपयोग करतात. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी आली आहे. रेल्वे तिकीट रद्द न करता तुम्ही प्रवासाची तारीख बदलू शकणार आहात. रेल्वेने घेतलेल्या या पुढाकाराचा कोट्यवधी प्रवाशांना फायदा होणार आहे.
रेल्वे विभागाने बदललेल्या या नियमानुसार, प्रवासी आपला प्रवास prepone किंवा postponed करू शकरणार आहेत. प्रवासाची तारीख बदलण्यासह प्रवासी प्रवास सुरू करण्याचे ठिकाणही (बोर्डिंग) बदलू शकणार आहेत. त्यासाठी बोर्डिंग स्थानकाच्या व्यवस्थापकांना एक अर्ज द्यावा लागेल. किंवा प्रवासाच्या २४ तासांपूर्वी कॉम्प्युटराइज्ड आरक्षित केंद्रावर जाऊन बदल करावा लागेल. या शिवाय भारतीय रेल्वेने अनेक बदल केले आहेत. इतर बदल काय आहेत हे जाणून घेऊयात.
रेल्वे विभागाच्या नव्या बदलांनुसार तुम्ही तुमचे गंतव्य स्थानक म्हणजेच डेस्टिनेशन स्टेशन पुढे वाढवू शकणार आहात. म्हणजेच तुम्ही ज्या स्थानकापर्यंत तिकीट आरक्षित केले असेल, त्याच्या पुढील स्थानकांपर्यंत तुम्ही जाऊ शकणार आहात. त्यासाठी प्रवाशांना तिकीट चेकिंग स्टाफला भेटून त्यांना प्रवासाबाबत माहिती द्यावी लागेल. या बदलांमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की, तुम्ही प्रवासाची तारीख फक्त एकदाच Prepone किंवा Postponed करू शकतात.
प्रवासाची तारीख Prepone किंवा Postponed करण्यासाठी ४८ तासांआधी आरक्षण केंद्रात जाऊन तिथे तिकीट सरेंडर करावे लागेल. ही सुविधा फक्त ऑफलाइन तिकीटांनाच लागू असेल. ऑनलाइन तिकिटावर ही सुविधा मिळणार नाही.