मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
भारतीय रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळे रेल्वेचा प्रवास हा बहुतांश प्रवाशांना सुखकर वाटतो. परंतु तरीही काही प्रवाशांना याबाबत अडचणी निर्माण होतात. कारण रेल्वे टिकीट वेळेवर उपलब्ध होत नाही तसेच तत्काळ तिकीट मिळण्यास अडचण निर्माण होते. काही वेळा अनेक ठिकाणी आपल्याला रेल्वे गाड्या अत्यंत खचाखच प्रवाशांनी भरलेल्या दिसतात, तर त्याच रूटवरील काही गाड्या रिकाम्या धावताना दिसतात. अशा विषम परिस्थितीवर मात करण्यासाठी रेल्वे विभागाने आता नवीन ॲप आणले आहे. यामुळे प्रवाशांना नेमक्या कोणत्या रेल्वे गाडीत किती जागा शिल्लक आहेत. तसेच तत्काळ तिकीट मिळणे देखील सहज शक्य होणार आहे. या मुळे रेल्वेमधील रिकाम्या जागांचा याचा अंदाज येऊ शकेल आणि त्याप्रमाणे रेल्वे तिकिटाचे बुकिंग करता येईल.
रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बाब ही आहे की, आता तत्काळ तिकिटांसाठी स्वतंत्र अॅप सुरू करण्यात आले आहे. हे अॅप आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरच उपलब्ध करून देण्यात आले आहे. अचानक प्रवास करण्याची गरज भासल्यास या अॅपद्वारे प्रवाशांना घरबसल्या तत्काळ तिकीट बुक करू शकता. सदर अॅप हे IRCTC च्या प्रीमियम भागीदाराद्वारे कन्फर्म तिकीट नावाने प्रदर्शित केले जाते. तत्काळ कोट्यातील उपलब्ध जागांची माहिती या अॅपवर देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ट्रेनचे वेगवेगळे नंबर टाकून प्रवाशांना उपलब्ध जागा शोधण्याची तसदी घ्यावी लागणार नाही. संबंधित मार्गावर एकाच वेळी धावणाऱ्या सर्व गाड्यांसाठी उपलब्ध असलेल्या तत्काळ तिकिटांचा तपशील मिळेल. विशेष म्हणजे हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरूनही डाउनलोड करू शकता. अॅपमध्ये तिकीट बुक करण्यासाठी मास्टर लिस्ट देखील आहे. ज्यामध्ये प्रवासासाठी आवश्यक असलेली माहिती अगोदर सेव्ह करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट बुकिंगसाठी वेळ वाया जाणार नाही.
तत्काळ तिकिटांचे बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होताच, सेव्ह डेटाद्वारे तिकिटांचे बुकिंग शक्य होईल. त्यानंतर ऑनलाइन पेमेंट होताच तिकिटाचे बुकिंग होईल. तथापि, प्रतीक्षा आणि विलंब देखील असू शकतो. अॅपचे नाव निश्चितपणे कन्फर्म तिकीट असे ठेवण्यात आले आहे, परंतु तत्काळ तिकिटांमध्येही सीट बर्थच्या उपलब्धतेवरच उपलब्ध असतील. हे अॅप आयआरसीटीसी नेक्स्ट जनरेशन मोबाइल अॅपवरूनही डाउनलोड केले जाऊ शकते. सध्या रेल्वे विभागाचे ९५ टक्के वाहने वेळेवर पोहोचत आहेत. ट्रेनमध्ये ड्रायव्हर आणि गार्ड बदलण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या धोरणाचा परिणाम दिसू लागला आहे. याचा फायदा म्हणजे प्रवासीही वेगाने आपल्या योग्य तथा गंतव्य स्थानी पोहोचत आहे.