पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – आपण सरकारी नोकरी शोधत असाल आणि रेल्वेत नोकरी करायची असेल तर चांगली संधी आहे. कारण रेल्वेत मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे. पूर्व रेल्वे (ER) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एकूण 2900 पदांची भरती होणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 10 मे 2022 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सध्या या डिव्हीजनमध्ये भरती सुरू आहे, हावडा, सियालदह, मालदा, आसनसोल, कांचरापारा, लिलुआ, जमालपूर यासह विविध युनिट्समध्ये ही भरती केली जाईल.
पूर्व रेल्वेने (ER) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण केलेली असावी. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे NCVT/SCV द्वारे जारी केलेल्या अधिसूचित व्यापारात राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे असावे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम RRC/ER कोलकाता च्या अधिकृत वेबसाइट www.rrcer.com ला भेट द्या. त्यानंतर ‘ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ एक्ट अप्रेंटिसेस फॉर ट्रेनिंग स्लॉट्स इन यूनिट्स ऑफ ईस्टर्न रेल्वे फॉर 2021-22’ वर क्लिक करा.
आता डाउनलोड वर स्क्रोल करा आणि ‘पुढे जाण्यासाठी क्लिक करा’ वर जा. पुढे, ट्रेड निवडा आणि अपंगत्वाचा प्रकार निवडा (असल्यास) आणि पुष्टी करा. आता उमेदवाराचा ईमेल आयडी/मोबाईल नंबर इत्यादीसह मूलभूत तपशील भरा. तुमचे युनिट प्राधान्य निवडा. पुढे, स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रे अपलोड करा. लागू असल्यास आता फी भरा.









