नाशिक – रेल्वे विभागात पॉइंटमन म्हणून काम करणारा तरुण मयूर शेळकेच्या धाडसाची सर्वत्र चर्चा असतांनाच नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी असेच धाडस करुन एका वृध्दाचे प्राण वाचवले आहे.
धावती रेल्वे पकडण्याच्या नादात पाय घसरल्याने रेल्वे व प्लॅटफॉर्ममध्ये सापडलेल्या वृद्धाचे प्राण इम्रान कुरेशी आणि राकेश शेडमांके (GRP) या दोघा रेल्वे पोलिसांनी वाचवले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे धाडस केल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.
ही संपूर्ण घटना प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे नेमके काय झाले त्यात दिसत आहे. गोदान एक्सप्रेसमधून प्रवास करणारा हा वृद्ध प्रवासी पाणी घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर उतरला होता. मात्र त्याचवेळी रेल्वे सुरू झाल्याने धावत्या रेल्वे पकडण्याच्या नादात या प्रवाशाचा पाय घसरला व तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकला. त्याचवेळी येथे ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्रवाशाचे प्राण वाचवले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!