पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या काळात मनुष्याला नानाविध प्रकारचे आजार होत आहेत. विशेषत: मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, यासारख्या मोठ्या आणि भयानक घातक असलेल्या आजाराने सर्व मानवी समाज त्रस्त झाला आहे. त्यातच मधुमेहामुळे गुंतागुंतीतून दुसरे आजार निर्माण होतात, त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना विशेष काळजी घ्यावी लागते. मधुमेहाच्या रुग्णांना एकीकडे धावपळीच्या जीवनात लोकांना पौष्टिक अन्न खाणे कठीण होत असताना दुसरीकडे भारतीय रेल्वे विभाग रुग्णांचा हा प्रश्न सोडवत आहे. IRCTC ची अधिकृत अन्न वितरण सेवा भागीदार रेल-रेस्ट्रो ट्रेनमधून लांबच्या प्रवासातही प्रवाशांना दर्जेदार पौष्टिक अन्न पुरवत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आता प्लॅटफॉर्मवरील जंक फूडवर अवलंबून न राहता प्रथिने, कार्ब्स, फायबर इत्यादींनी युक्त आहार घेऊ शकतात. उदाहरणार्थ, चिकन सॅलड, ड्रायफ्रुट्स, ज्यूस, उकडलेले अंडे, ऑम्लेट, सूप, ओट्स, उपमा, पोहे यांचा समावेश असून असा फॅट लॉस डाएटचा पर्यायही देत आहे.
रेल्वे-रेस्ट्रोचे संस्थापक आणि संचालक मनीष चंद्र म्हणाले की, रेल्वे प्रवाशांसाठी ही वेगळी गोष्ट आहे, कारण सहसा मधुमेही प्रवाशांना ट्रेनमध्ये दर्जेदार जेवण मिळत नाही. रेल कंपनी रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याबाबत अत्यंत जागरूक आहे. स्वच्छतापूर्ण स्वयंपाकघरात शिजवलेले सुरक्षित आणि दर्जेदार अन्न असो, किंवा उत्कृष्ट पॅकेजिंगसह संपर्करहित डिलिव्हरी असो की प्रत्यक्ष सेवा, प्रत्येक बाबतीत रेल रेस्टो ही रेल्वे प्रवाशांची पहिली पसंती बनली आहे. तसेच मनीष चंद्रा यांनी आणखी सांगितले की, प्रवाशांच्या फिटनेससाठी जितका व्यायम आवश्यक आहे, तितकीच त्यांच्यासाठी संपूर्ण आहाराची गरज आहे. हे लक्षात घेऊन कंपनीने प्रवासादरम्यान दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात संपूर्ण आहाराचा समावेश केला आहे.
शाकाहारींसाठी रोटी, भात, डाळ, सब्जी, कोशिंबीर, पनीर तसेच त्यांच्या वैयक्तिक मागण्या पूर्ण करतात. त्याचवेळी, मांसाहारींसाठी स्वतंत्र जेवणात अंडी करी, चिकन करी किंवा फिश करी यांचा समावेश होतो. याशिवाय रेल्वे प्रवाशांना चीज सँडविच, व्हेजिटेबल सँडविच, एग सँडविच, चिकन सँडविच वाजवी दरात मिळू शकतात. धावत्या गाड्यांमध्ये तुमच्या आवडीचे स्वादिष्ट, रुचकर आणि पौष्टिक खाद्यपदार्थ पीएनआर नंबरद्वारे, रेल्वे रेस्ट्रो वेबसाइट किंवा तुमच्या स्वतःच्या सीटवर असलेल्या रेल रेस्ट्रो अॅपवरून ऑर्डर करू शकतात.