मुंबई – रेल्वेने साईनगर शिर्डी ते हावडा आणि मुंबई ते गोरखपूर दरम्यान (साप्ताहिक) विशेष अतिजलद गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
– साईनगर शिर्डी ते हावडा विशेष
02593 विशेष अतिजलद साईनगर शिर्डी येथून दि. १९.६.२०२१ आणि २६.६.२०२१ रोजी १४.१० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी हावडा येथे १९.३० वाजता पोहोचेल.
02594 विशेष हावडा येथून दि. १७.६.२०२१ आणि २४.६.२०२१ रोजी १४.३५ वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसर्या दिवशी १९.१० वाजता पोहोचेल.
थांबे : कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खडगपूर.
संरचना : १ द्वितीय वातानुकूलित , २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ५ द्वितीय आसन श्रेणी.
– मुंबई ते गोरखपूर विशेष ट्रेन
05401 विशेष गोरखपूर येथून बुधवार दि. १६.६.२०२१ रोजी १९.०० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे तिसर्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल.
05402 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून शुक्रवार दि. १८.६.२०२१ रोजी ०७.५० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्या दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, चित्रकूट धाम, बांदा, रागौल, भरूआ सुमेरपुर, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद.
संरचना : २ द्वितीय वातानुकूलित , ६ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान आणि ४ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : पूर्णतः आरक्षित विशेष गाडी क्रमांक 02593 आणि 05402 साठी विशेष शुल्कासह
या आहे रेल्वेच्या सुचना
बुकिंग दि. १५.६.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in सुरू करण्यात आलेले आहे. तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.