मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दौंड ते मनमाड रेल्वे मार्गावर १० ते २४ जानेवारी दरम्यान १४ दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे स्थानका दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी हा मेगा ब्लॅाक असणार आहे. १५ दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मात्र होणार हाल होणार आहे. या ब्लॉकमुळे ६ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले आहे. या ब्लॅाकमुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठा बदल होणार आहे.
कोपरगाव – कान्हेगाव सेक्शन दरम्यान ब्लॅक घेतला आहे. त्या दरम्यान १० ते २४ जानेवारी काळात दौंड – निजामाबाद डेमू तसेच १२ ते २६ जानेवारी दरम्यान निजामाबाद – पुणे डेमू रद्द करण्यात आली आहे. तसेच १२ ते १९ जानेवारी दरम्यान दौंड – भुसावळ – दौंड डेमू रद्द करण्यात आली आहे. २१ ते २३ जानेवारी व २३ ते २५ जानेवारी दरम्यान कोल्हापूर – गोंदिया -कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. २२ जानेवारी दरम्यान हावडा – पुणे, हटिया – पुणे या दोन्ही रेल्वेचे मार्ग नागपूरहून बदलण्यात आले आहे. नागपूर – बल्लारशहा – काजीपेट, सिंकदराबाद, दौंड, पुणे आदी मार्गाने धावेल. २३ जानेवारी रोजी हजरत निजामुद्दीन – मैसूर एक्सप्रेस ही रेल्वे रतलाम, बडोदरा, वसई रोड, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे मार्गे धावेल.
या रेल्वे मनमाड, इगतपुरी,
कल्याण, पनवेल, लोणावळा, या मार्गाने धावेल
पुणे – अमरावती ( १८ जानेवारी)
पुणे – नागपूर – ( १९ जानेवारी )
अमरावती – पुणे (१९ जानेवारी)
पुणे – अजनी (२० जानेवारी)
नागपूर – पुणे (२० जानेवारी)
पुणे – अजनी (२१ जानेवारी)
अजनी – पुणे (२२ जानेवारी)
अजनी – पुणे (२४ जानेवारी )