नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वे बोर्डाने ८ मार्च रोजी एक आदेश जारी केला आहे. या आदेशात रेल्वेच्या १७ झोनला रेल्वेच्या रिकामी स्थानकं वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यांचा योग्य पद्धतीने वापर झाला नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान रेल्वेला झाले आहे. आता या झोनची जबाबदारी झोनल रेल्वेकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयआरसीटीसीने रेल्वे बोर्डाला या आदेशावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. तसेच रेल्वे आता महसूल वाढवण्यासाठी स्वतःचे फूड प्लाझा, फास्ट फूड आऊटलेट्स आणि केटरिंग युनिट व्यतिरिक्त रेस्टॉरंट उघडण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
रेल्वेने आपल्या आदेशात पुढे म्हटले आहे की, आयआरसीटीसीला दिलेल्या अनेक जागा रिकाम्या राहिल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना योग्य सेवा मिळत नाही आणि त्यामुळे रेल्वेचे महसूल बुडत आहे, त्यामुळे झोनल रेल्वेला या रेल्वे स्थानकांवर काम करण्याची परवानगी दिली जाईल. उपलब्ध रिकाम्या जागेवर फूड प्लाझा/फास्ट फूड युनिट/रेस्टॉरंट उघडण्यात येतील.
आयआरसीटीसीचे प्रवक्ते आनंद झा म्हणाले, “आम्ही रेल्वेला या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. रेल्वेकडून हा निर्णय बदलण्यात येतो का याकडे आमचे लक्ष आहे.” सद्यस्थितीत आयआरसीटीसीद्वारे तीनशे फूड प्लाझा चालवले जातात. तर झोनल रेल्वेकडून अशी १०० – १५० आउटलेट्स उभारण्याची योजना आखण्यात आली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.