नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालूक्यातील श्री क्षेत्र नस्तनपुर येथील रेल्वे गेट रेल्वे लाईनची दुरुस्ती व इतर कामासाठी आज पासून रविवार पर्यंत असे तीन दिवस बंद राहाणार आहे. रेल्वे गेट बंद असणा-या काळात नांदगाव-चाळीसगाव या मार्गावरील वाहतूक मालेगाव मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना ३६ किमीचा वळसा घालून जावे लागणार आहे. या कामामुळे ग्रामीण भागातील नागरीकांची गेटबंदमुळे मोठी गैरसोय झाली आहे. हलक्या वाहनांसाठी तरी एकेरी मार्ग सुरु ठेवण्याची मागणी या भागातील स्थानिकांनी केली आहे.