नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वेने डिजिटल इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी, रेल्वे स्थानकांवरील खानपान सेवा केन्द्रांद्वारे खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी डिजिटल पद्धतीला प्रोत्साहन दिले जात आहे. ८८७८ केंद्रावर डिजिटल व्यवहाराची सुविधा आहे. या व्यतिरिक्त, केलेल्या व्यवहारांचे सर्व तपशील प्रतिबिंबित करणारी छापील बिले आणि पावत्या तयार करण्यासाठी सहजतेने हाताळता येणारी पीओएस अर्थात पॉस यंत्रे खानपान केन्द्रांना प्रदान केली जात आहेत. तसेच अधिकचे शुल्क आकारले जाण्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठीही यामध्ये सुविधा देण्यात आली आहे. सध्या ५९६ गाड्यांमधे ३०८१ पॉस यंत्रे उपलब्ध आहेत. तसेच ४३१६ कायम स्थापित केन्द्रांना पॉस यंत्रे दिली आहेत.
रेल्वेमधील प्रवाशांसाठी उपलब्ध पर्यायांची व्याप्ती वाढवण्यासाठी, भारतीय रेल्वेत ई-कॅटरिंग सेवा सुरू केली आहे. ई-कॅटरिंग सेवेचे व्यवस्थापन आयआरसीटीसी करते. प्रवासी, ई-तिकीटाची नोंदणी करताना किंवा रेल्वेमध्ये प्रवास करताना अॅप/कॉल सेंटर/संकेतस्थळ/१३२३ संपर्क साधून त्यांच्या आवडीच्या भोजनाची आगाऊ नोंदणी करू शकतात. ई-कॅटरिंग सेवा सध्या ३१० रेल्वे स्थानकांवर १७५५ सेवा प्रदात्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. १४ खानपान सेवा मध्यस्थ, दररोज सरासरी ४१,८४४ भोजन-थाळी पुरवतात.