मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पश्चिम रेल्वेमधील जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये झालेला गोळीबार भारतातील लोक अद्याप विसरलेले नाहीत. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आणि अकारण दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम केले. या घटनेतील मुख्य आरोपीने एका मुस्लीम महिलेला ‘जय माता दी’ म्हणायला लावले होते, अशी बाब उघडकीस आली आहे.
गोळीबार करणारा चेतनसिंह चौधरी याने त्या दिवशी गोळीबार करण्यापूर्वी एका मुस्लीम महिलेला जय माता दी म्हणायला लावले होते, अशी साक्ष खुद्द त्या महिलेनेच पोलिसांत दिली आहे. त्याने मला जय माता दी म्हणायला लावले. माझी हरकत नव्हती. पण त्याने माझ्यावर रायफल ताणली तेव्हा मात्र मी जरा घाबरले. त्याच्या रायफलवर हात ठेवून तू कोण आहेस, असा सवाल त्याला केला. त्यावेळी त्याच्या रायफलला हात लावल्यामुळे तो प्रचंड संतापला आणि पुन्हा माझ्या रायफलला हात लावला तर गोळ्या घालीन, अशी धमकीही त्याने मला दिली होती, असे संबंधित मुस्लीम महिलेने पोलिसांत साक्ष देताना सांगितले.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तू कोण आहेस, या प्रश्नावर त्याला जेवढा राग आला नाही, त्याहीपेक्षा जास्त मुस्लीम महिलेने त्याची रायफल हाताने बाजुला केल्याचा राग त्याला आला. त्याच रागातून त्याने महिलेला गोळ्या झाडून मारून टाकण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी चेतनसिंहविरोधात धार्मिक द्वेष निर्माण केल्याप्रकरणी कलम वाढवण्यात आले होते. महिलेची साक्ष धार्मिक द्वेष निर्माण केल्याबाबत आरोप सिद्ध करण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जयपूर- मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये चार प्रवाशांना गोळय़ा झाडून हत्या करणाऱ्या आरोपी चेतनसिंह बोरिवली रेल्वे पोलिसांच्या अटकेत आहे.
तो व्हिडिओ तर भयंकर
चेतनसिंहने असगर याच्या मृतदेहाच्या शेजारी उभे राहून धार्मिक द्वेष पसरवणारे भाष्य केलेला व्हिडियो व्हायरल झाला होता. हा व्हिडियो सोशल मिडियावर आल्यानंतर त्यातील आवाज आरोपी चेतनसिंह याचाच असल्याची पडताळणी करण्यात आली आहे. त्यासाठी चेतनसिंहच्या आवाजाचे नमुने, छायाचित्रे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.
Railway Firing RPF Jawan Chetan Singh CCTV Muslim Women
Jai Mata Di Slogan Gun Video