इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – साधारणपणे चोर म्हटले की सोने चांदी, पैसे, मोबाईल किंवा अन्य मौल्यवान आणि किमती वस्तू चोरून नेतात, परंतु चोरांनी जर रेल्वेचे इंजिन चोरून नेले, तर कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतु अशी घटना बिहारमध्ये घडली असून या चोरी प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच रेल्वे विभागाला मोठा हादरा बसला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी एका प्रचंड मोठ्या पुलाची देखील अशी चोरी झाली होती, त्यामुळे आता चोरटे काय चोरतील याचा नियम राहिलेला नाही, असे म्हटले जात आहे. रोहतास येथे ५०० टन वजनाचा लोखंडी पूल चोरल्यानंतर चोरट्यांनी आणखी एक मोठी घटना घडली आहे. चोरट्यांनी आता बोगदा बनवून संपूर्ण रेल्वे इंजिन गायब केले आहे. त्यानंतर मुझफ्फरपूरमधील एका भंगाराच्या दुकानातून जप्त केले त्या बॅगा रेल्वेच्या इंजिनच्या पार्ट्सने भरलेल्या होत्या.
बिहारच्या ईशान्य अररिया जिल्ह्यातील सीताधार नदीवरील लोखंडी पुलाचे भाग एका टोळीने तोडले आहे. पुलाचा इतर महत्त्वाचा भाग गायब झाल्याने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी गुन्हा नोंद केली असून त्याच्या संरक्षणासाठी एक हवालदार नियुक्त करण्यात आला. हा पलटनिया पूल फारबिसगंज शहराला राणीगंजला जोडतो. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. याबाबत फारबिसगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सांगितले की, आम्ही पुलाच्या सुरक्षेसाठी एक हवालदार तैनात केला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, लोखंडी पुलाचा काही भाग चोरल्याप्रकरणी आम्ही अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठवड्यात एका टोळीने बरौनी तथा बेगुसराय जिल्ह्यातील गरहरा यार्ड येथे दुरुस्तीसाठी आणलेल्या ट्रेनचे संपूर्ण डिझेल इंजिन चोरून नेले होते. वेळोवेळी काही भाग चोरून या टोळीने हे अख्खे इंजिन पळवून नेले. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला. ताब्यात घेतलेल्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी मुझफ्फरपूरच्या प्रभात कॉलनीमध्ये असलेल्या एका भंगाराच्या गोदामाबाबत माहिती कळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी तेथून इंजिनच्या भागांच्या १३ गोण्या जप्त केल्या. याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आम्हाला यार्डजवळ एक बोगदा सापडला, ज्यातून चोरटे यायचे आणि इंजिनचे पार्ट चोरायचे आणि बारीक पोत्यात घेऊन जायचे. याबाबत रेल्वे अधिकारी पूर्णपणे बेसावध होते.
यापुर्वी पूर्णिया जिल्ह्यात चोरांनी एक संपूर्ण विंटेज मीटर गेज वाफेचे इंजिन विकले होते, खरे तर ते सार्वजनिक प्रदर्शनासाठी स्थानिक रेल्वे स्टेशनवर ठेवले होते. तपासादरम्यान पोलिसांना आढळले की समस्तीपूर विभागाच्या विभागीय यांत्रिक अभियंत्याने जारी केलेल्या बनावट पत्राच्या आधारे एका रेल्वे अभियंत्याने क्लासिक स्टीम इंजिनची विक्री केल्याची माहिती मिळाली होती. आता गरहारा यार्डमध्ये दुरुस्तीसाठी आलेले ट्रेनचे डिझेल इंजिन एका टोळीने चोरीन नेले. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल असता, सुरुवातीला तीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुजफ्फरपूरच्या भंगाराच्या गोदामातून इंजिनच्या पार्ट्सनी भरलेल्या १३ बॅगा आढळल्या. आता याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Railway Engine Theft by Thieves Crime Police
Bihar