नवी दिल्ली – रेल्वेमध्ये मासिक हंगामी तिकिटावर (Monthly Seasonal Ticket) दररोज प्रवास करण्याची परवानगी रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. कोविडमुळे अनारक्षित मेल/एक्स्प्रेस यासारख्या विशेष गाड्यांमध्ये सीजन तिकिटांवर प्रवास करण्याची परवानगी आधी दिली नव्हती. आता अनारक्षित काउंटर, एटीव्हीएम/सीओ-टीव्हीएम, यूटीएस ऑन मोबाइलच्या माध्यमातून सिजन तिकीट जारी करण्याची तसेच नूतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ज्या प्रवाशांचा सिजन तिकीटावरील उर्वरित प्रवासाचा कालावधी लॉकडाउनमुळे रद्द झाला होता, ते तितक्याच दिवसांचा कालावधीचा प्रवास पुन्हा करू शकतात. उत्तर रेल्वेच्या यूटीएस काउंटरवर ती सुविधा मिळवू शकता. परंतु त्या कालावधीदरम्यान त्यांच्या रेल्वे रद्द झाल्या असतील किंवा केंद्र किंवा राज्य सरकारने लावलेल्या कोरोना प्रतिबंधांमुळे ते प्रवास करू शकले नसतील. त्यांनाच हा प्रवास करता येईल, अशी अट घालण्यात आली आहे.
पाच विभागांच्या रेल्वेंचा समावेश
उत्तर रेल्वेने ही सुविधा पाच विभागाच्या रेल्वेंना दिली आहे. त्यांची यादी आपण पाहू शकतो.