नवी दिल्ली – कोविड 19 विरूद्ध अथक संघर्षात रेल्वे अधिकारी आणि पथके वेळेवर व समन्वयित कृती करून राज्य आरोग्य अधिकारी व प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा वेग कायम ठेवत आहेत. लक्ष केंद्रित देखरेख आणि तपशीलवार कार्यगती प्रोटोकॉलच्या माध्यमातून, राज्यांच्या मागणीनुसार देशाच्या विविध भागात अलगीकरणासाठी रेल्वेचे बोगी पोहोचविणे रेल्वेला शक्य झाले आहे. फलाटावर तैनात असलेल्या आयसोलेशन बोगीना योग्यरित्या सुरक्षित केले गेले आहे, फिरते तंबू देण्यात आले आहेत आणि कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय कर्मचार्यांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पीपीई किट शरीरावर चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यावर रेल्वेने पुरुष व महिला आरोग्यसेवा कर्मचार्यांना समर्पित बोगीमध्ये स्वतंत्र तात्पुरती एकके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. या आरोग्य सेवांवर आरपीएफ कर्मचारी चोवीस तास तैनात असतात. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रेल्वेने प्रत्येक बोगीत २ ऑक्सिजन सिलिंडर आणि अग्निशामक यंत्रांचीही व्यवस्था केली आहे. इतर गोष्टींबरोबरच रेल्वेने दिशानिर्दिष्ट मार्गदर्शन , रुग्णांच्या वाहतुकीसाठी रॅम्पची सुविधादेखील या बोगीमध्ये दिली आहे.
अलगीकरण बोगी आता देशातील ७ राज्यांमधील १७ स्थानकांवर तैनात असून याद्वारे कोविड रूग्णांची काळजी घेतली जात आहे . ४७०० पेक्षा जास्त खाटांच्या क्षमतेसह सध्या 298 रेल्वे बोगी विविध राज्यांकडे सोपविण्यात आल्या आहेत. ७ राज्यात तैनात बोगींची माहिती खालीलप्रमाणे आहेः
रेल्वेने महाराष्ट्रात ६० बोगी तैनात केल्या आहेत. नंदुरबार येथे कोविड रूग्णांची सातत्याने नोंद झाली आहे आणि कालांतराने अलगीकरण कालावधी पूर्ण केल्यानंतर वैदकीय प्रमाणपत्र देऊन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्य आरोग्य प्राधिकरणाद्वारे आतापर्यंत ११६ बाधितांच्या प्रवेशाची नोंद झाली असून ९३ बाधितांना घरी सोडण्यात आले आहे. २३ रुग्ण आता या सुविधेचा उपयोग करीत आहेत. रेल्वेने अजनी इनलँड कंटेनर डेपो येथे ११ कोविड केअर बोगी ( वैद्यकीय कर्मचारी आणि पुरवठा यासाठी खास एक बोगी) नागपूर महानगरपालिकेकडे सुपूर्द केल्या. येथे ९ रूग्ण दाखल करण्यात आले आणि अलगीकरण पूर्ण झाल्यावर त्यांना सोडण्यात आले. पालघर येथे रेल्वेने अलीकडेच २४ बोगी उपलब्ध करुन दिल्या असून इथे ही सेवा कार्यरत आहे.
रेल्वेने मध्य प्रदेशात ४२ बोगी तैनात केल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाने इंदूरजवळील तिही स्थानकापाशी ३२० खाटांची क्षमता असलेले २२ बोगी तैनात केल्या आहेत. येथे आतापर्यंत 21 रुग्ण दाखल करण्यात आले असून ७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. भोपाळ येथे २० कोच तैनात आहेत. ताज्या आकडेवारीनुसार येथे २९रुग्णांना दखल करण्यात आले तर ११ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या १८ रुग्ण या सुविधेचा उपयोग करत आहेत. या ठिकाणी ३०२ खाटा उपलब्ध आहेत.
ताज्या माहितीनुसार आसामने नुकत्याच केलेल्या मागणीनुसार रेल्वेने २१ अलगीकरण बोगी गुवाहाटीला आणि २० अलगीकरण बोगी सिलचर (एन. एफ. रेल्वे) जवळ बदरपुर येथे तातडीने पाठवल्या आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला अनुक्रमे साबरमती, चांदलोदिया आणि दिमापूर येथे अलगीकरण बोगी तैनात करण्यात आल्या.
दिल्लीमध्ये, १२०० खाटांची क्षमता असलेल्या ७५ कोविड केअर बोगींची राज्य सरकारची मागणी रेल्वेने पूर्ण केली. रेल्वेचे ५० बोगी शकुरबस्ती येथे तर २५ बोगी आनंद विहार स्थानकात आहेत. 5 जण येथे दाखल होते, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. येथे एकूण १२०० बेड उपलब्ध आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये अद्याप राज्य शासनाने मागणी केली नसली तरी एकूण (५० बोगी ) ८०० खाटांची क्षमता असलेले १० बोगी प्रत्येकी फैजाबाद, भदोही, वाराणसी, बरेली आणि नझीबाबाद येथे तैनात करण्यात आल्या आहेत. अलगीकरण एकके म्हणून सुमारे ७०००० खाटांचे ४४०० हून अधिक अलगीकरण बोगींची ताफा रेल्वेने उपलब्ध केला आहे.