मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वेच्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. जनरल तिकीटाद्वारे प्रवाशांना प्रवास करता येतो. पूर्वनियोजित प्रवास असेल तर आरक्षित तिकीटाची सुविधा असते. तसेच, अचानक प्रवासासाठी तत्काळ तिकीटाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, तत्काळ तिकीट मिळण्यासाठी खुपच वणवण करावी लागते. अनेकदा तर एजंटकडूनच तत्काळ तिकीट घ्यावे लागते. अनेकदा मागणी अधिक आणि तत्काळ तिकीटाचा पुरवठा कमी असेही होते. मात्र, तत्काळ तिकीट नसतानाही तुम्ही रेल्वे प्रवास करु शकता ते कसे हे आपण आता जाणून घेऊया…
सर्व प्रथम तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागेल. त्यानंतर तुम्ही इच्छित रेल्वेमध्ये प्रवेश करु शकता. त्यानंतर तुम्ही रेल्वे तिकीट तपासनीस (टीसी) ला भेटू शकता. त्यांच्याकडे तुम्ही पैसे देऊन तिकीट घेऊ शकतो. रेल्वे बोगीमध्ये जागा उपलब्ध करुन देण्याबाबत टीसी तुम्हाला व्यवस्था करुन देतो. म्हणजेच तो कन्फर्म तिकीट देतो. तसेच, जागा नसल्यास टीसी दंड घेऊन तुम्हाला प्रवासाची सुविधा देऊ शकतो.