चाळीसगाव – चाळीसगाव – वाघळी रेल्वेस्थानक दरम्यान पाटलीपुत्र एक्सप्रेसचे अर्धे डब्बे इंजिनपासून वेगळे झाले. रेल्वे रुळावरुन धावत असतांना हा अपघात झाला. रेल्वेच्या डब्ब्यांना जोडणारे कप्लींग तुटल्यामुळे ही घटना झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातात कोणतेही नुकसान झाले नाही. काही वेळानंतर हे डब्बे पुन्हा एकत्रीत करण्यात आले. त्यानंतर रेल्वे पुन्हा धावली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस घटनास्थळी पोहचले. रेल्वे स्लो असल्यामुळे मोठा अपघात टळल्याचे बोलले जात आहे. रेल्वेत असे अपघात वारंवार होत असतात. त्यामुळे या गोष्टीकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. ही रेल्वे जर स्पीडमध्ये असती तर त्यातून मोठी दुर्घटना झाली असती असे बोलले जात आहे. या अपघातामुळे रेल्वेचे अर्धे डब्बे इंजिनला व अर्धे डब्बे हे गार्डच्या बोगीला होते.