नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओडिशा रेल्वे अपघाताबाबत रेल्वे बोर्डाने आज मोठा खुलासा केला आहे. हा अपघात नेमका कसा घडला यासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे बोर्डाने केले आहेत. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात सर्व माहिती दिली आहे. बोर्डाने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाचा हवाला देत म्हटले आहे की, टक्कर होण्यापूर्वी दोन्ही गाड्यांना ग्रीन सिग्नल मिळाला होता. फक्त कोरोमंडल एक्सप्रेस या अपघाताचा बळी ठरली. मालगाडी लूप लाईन मध्ये उभी होती.
रेल्वे बोर्डाच्या सदस्य जया वर्मा सिन्हा म्हणाल्या की, मालगाडी लूप लाइनवर उभी असतानाही कोरोमंडल एक्सप्रेसला हिरवा सिग्नल मिळाला. त्यामुळे कोरोमंडल गाडी रुळावरून घसरली. अपघातानंतर रेल्वेकडून प्रथम मदत आणि बचाव कार्य करण्यात आले. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू आहे.
बहनगा स्टेशनवर ४ रेल्वे लाईन आहेत. यात दोन मुख्य लाईन आहेत. लूप लाईनवर मालगाडी होती. चालकाला स्टेशनवर ग्रीन सिग्नल मिळाला होता. दोन्ही वाहने पूर्ण वेगाने धावत होती. प्राथमिक तपासात सिग्नलमध्ये गडबड झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेत फक्त कोरोमंडल एक्सप्रेस आली.
‘कवच’ निर्यात करणार
जया वर्मा सिन्हा म्हणाल्या की, ‘कवच’ ही भारतात बनलेली प्रणाली आहे. आगामी काळात आपण त्याची निर्यातही करू शकू. त्याचा संबंध रेल्वेच्या सुरक्षेशी आहे. म्हणूनच आम्ही त्याची कठोर चाचणी केली आहे. रेल्वेमंत्र्यांनी स्वत: ट्रेनमध्ये बसून तपासणी केली. हे उपकरण सर्व मार्गांवर आणि ट्रेनमध्ये बसवण्यास वेळ आणि पैसा लागेल. आज संध्याकाळी आठच्या सुमारास आम्हाला दोन रेल्वे लाईन मिळतील, ज्यावर ट्रेन संथ गतीने जाऊ लागेल. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सिग्नलमुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा असे प्रथमदर्शनी दिसते.
प्राथमिक तपासात सिग्नलमध्ये काही समस्या आढळून आल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. मालगाडी दोन लूप लाईनवर उभी होती. कोरोमंडल एक्सप्रेसचा वेग ताशी १२८ किमी होता. यशवंतपूर एक्सप्रेस ट्रेन देखील १२६ किलोमीटर वेगाने येत होता. यादरम्यान कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला धडकली. मालगाडीत लोखंड भरले होते. त्यामुळे मालगाडीच्या वॅगन्सही त्यांच्या जागेवरून हलल्या नाहीत आणि त्यामुळेच कोरोमंडल एक्स्प्रेसच्या प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. यावेळी तेथून यशवंतपूर एक्स्प्रेस जात होती. या धडकेनंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे रुळावरून घसरलेले डबे यशवंतपूर एक्स्प्रेसच्या मागील दोन डब्यांना धडकले. त्यामुळे यशवंतपूर एक्स्प्रेसचे डबेही रुळावरून घसरले.
Railway Board Clarification on Odisha Train Tragedy