इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या एका निर्णयाची सध्या देशभर चर्चा होत आहे. रेल्वेने एका विद्यार्थ्याला ज्या प्रकारे मदत केली, त्याचे कौतुक होत आहे. पुरामुळे ट्रेन रद्द झाल्यानंतर, रेल्वेने IIT मद्रासच्या विद्यार्थ्याला कारने ८५ किलोमीटर दूरवरील वडोदरा स्टेशनवर पाठवले. तेथून या परीक्षार्थ्याला चेन्नईची ट्रेन मिळाली.
आयआयटी मद्रासमधील एरोस्पेस इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेल्या सत्यम गडवी याला रेल्वे प्रशासनाने एकता नगर ते वडोदरा स्टेशनपर्यंत कॅब सेवा दिली. कॅबचे भाडे रेल्वे अधिकाऱ्यांनी भरले. गडवी यांनी रेल्वे कर्मचार्यांचे कौतुक करणारा एक व्हिडिओ जारी केला असून यावरून भारतीय रेल्वे प्रत्येक प्रवाशाला किती महत्त्व देते हे दिसून येते.
वास्तविक गडवी यांनी एकता नगर ते चेन्नई रेल्वेचे तिकीट बुक केले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे एकता नगर ते वडोदरा दरम्यान ट्रॅकचा काही भाग वाहून गेला. त्यामुळे दोन्ही स्थानकांदरम्यानच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. स्टेशनवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना गाडीने वडोदरा येथे नेण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. फक्त गडवी यांनी एकतानगर येथून ट्रेन क्रमांक 20920 एकतानगर – एमजीआर चेन्नई सेंट्रलमध्ये तिकीट बुक केले होते.
गडवी यांना रेल्वेने नक्की कशी मदत केली हे जाणून घेण्यासाठी बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/DRMBRCWR/status/1547265189308862464?s=20&t=vW_lN34Xog1CwtdgIVIZBw
दरम्यान, रेल्वेच्या उत्कृष्ट सेवेचे अनेक उदाहरणे समोर येत आहेत. रेल्वे अधिकारी गणेश घोष यांनी पुलावर उभ्या असलेल्या रेल्वेखाली जाऊन हवेची गळती बंद केली. त्यामुळे रेल्वे पुढे जाऊ शकली. तर काही महिन्यांपूर्वी, वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांनीही एक उत्तम कामगिरी केली. मुंबईपासून ८० किमी अंतरावर असलेल्या टिटवाळा आणि कर्डावली मार्गावरील पुलावर साखळी ओढल्यामुळे रेल्वे थांबली. या थांबलेल्या ट्रेनमधील अलार्म चेन पुन्हा सेट करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून त्यांनी कामगिरी बजावली होती.
railway administration excellent work student sent by car Train Cancel Flood Gujrat