मुंबई – रेल्वेने आठवड्यातून 4 दिवस चालत असलेली ट्रेन क्रमांक 01221/01222 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – हजरत निजामुद्दीन राजधानी स्पेशल 1.7.2021 पासून पुन्हा दररोज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
01221 सीएसएमटी मुंबई – हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष आता दिनांक 01.7.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज धावेल.
01222 हजरत निजामुद्दीन – सीएसएमटी मुंबई राजधानी विशेष आता दिनांक 02.07.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज धावेल.
आरक्षण: राजधानी विशेष ट्रेन क्रमांक 01221 च्या विस्तारित फ्रीक्वेंसीसाठी बुकिंग यापूर्वीच सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू झाले आहे.
या आहे रेल्वेच्या सुचना