भुसावळ – मनमाड मुंबई आणि जालना मुंबई विशेष सेवा पूर्ववत करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.त्याचा तपशील खाली रेल्वेने दिला आहे.
1) मनमाड मुंबई पंचवटी विशेष
ट्रेन क्रमांक 02110 मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी विशेष दि. २५.६.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज मनमाड येथून सुटेल.
ट्रेन क्रमांक 02109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड पंचवटी विशेष दि. २६.६.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.
2) जालना मुंबई जनशताब्दी विशेष
ट्रेन क्रमांक 02272 जालना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी विशेष दि. २६.६.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज जालना येथून सुटेल.
ट्रेन क्रमांक 02271 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जालना जनशताब्दी विशेष दि. २५.६.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.
संरचना- 2 वातानुकूलित चेअर कार , 12 सेकंड क्लास सेटिंग
आरक्षण : पूर्णपणे आरक्षित विशेष गाडी क्रमांक 02109/02110 आणि 02271 साठी बुकिंग दि. २४.६.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.