मुंंबई – मध्य रेल्वेने मुंबई आणि वाराणसी दरम्यान विशेष ट्रेनच्या आठ फे-या तर पुणे व जबलपूर दरम्यानच्या विशेष अतिजलद (साप्ताहिक) गाड्यांच्या धावण्याचा कालावधी व वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे
रेल्वेने मुंबई आणि वाराणसी दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा तपशील खाली दिला आहे.
04239 विशेष दि. १२.६.२०२१, १४.६.२०२१,
१६.६.२०२१ व १८.६.२०२१ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून दुपारी २३.५० वाजता सुटेल व वाराणसी येथे तिसर्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल.
04240 विशेष दि. ११.६.२०२१, १३.६.२०२१,
१५.६.२०२१ व १७.६.२०२१ रोजी वाराणसी येथून १९.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसर्या दिवशी २२.१० वाजता पोहोचेल.
थांबे :कल्याण, नाशिकरोड,भुसा
संरचना : २ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान आणि ८ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : 04239 या विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. १२.६.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण
या आहे सुचना
केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर प्रारंभ झाले आहे. तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail. gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
— — –
पुणे आणि जबलपूर दरम्यान विशेष अतिजलद (साप्ताहिक) गाड्यांचा विस्तार
रेल्वेने पुणे व जबलपूर दरम्यानच्या विशेष अतिजलद (साप्ताहिक) गाड्यांच्या धावण्याचा कालावधी व वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिलेल्या माहितीनुसार:
02131 विशेष (साप्ताहिक) दि. ५.७.२०२१ पासून २.८.२०२१ पर्यंत दर सोमवारी पुणे येथून ११.३० वाजता सुटेल आणि जबलपूर येथे दुसर्या दिवशी ०६.०० वाजता पोहोचेल.
02132 विशेष (साप्ताहिक) दि. ४.७.२०२१ पासून १.८.२०२१ पर्यंत दर रविवारी जबलपूर येथून १३.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर आणि मदन महल.
संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : 02131 या विशेष अतिजलद साप्ताहिक गाडीचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. १२.६.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.