भुसावळ – मध्य रेल्वेने मुंबई-अमृतसर, कोल्हापूर- हजरत निजामुद्दीन, पुणे -सांतरागाछी/हटिया दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेची माहिती रेल्वेने दिली आहे.
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमृतसर विशेष (दैनिक)
०१०५७ – विशेष दि. १६.६.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज २३.३० वाजता सुटेल आणि अमृतसर येथे तिसर्या दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल.
०१०५८ – विशेष दि. १९.६.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत अमृतसर येथून दररोज ०८.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्या दिवशी ००.०५ वाजता पोहोचेल.
थांबे : मध्य रेल्वेवर दादर, ठाणे, कल्याण, कसारा (केवळ 01057 साठी), नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, सावदा, रावेर, बुरहानपूर, नेपानगर, खंडवा.
संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ द्वितीय आसन श्रेणी.
२. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन विशेष अतिजलद (साप्ताहिक)
०२०४७- विशेष अतिजलद दि. ६.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून दर मंगळवारी ०९.१० वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसर्या दिवशी १७.५० वाजता पोहोचेल.
०२०४७– विशेष अतिजलद दि. ८.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत हजरत निजामुद्दीन येथून दर गुरूवारी ०५.१० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे दुसर्या दिवशी १३. ३० वाजता पोहोचेल.
थांबे : मध्य रेल्वेवर मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा.
संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.
३. पुणे – सांतरागाछी विशेष अतिजलद (साप्ताहिक)
०२४९१ -विशेष अतिजलद (साप्ताहिक) दि. १२.६.२०२१ ते २६.६.२०२१ (३ फे-या) पर्यंत पुणे येथून दर शनिवारी १७.४० वाजता सुटेल व सांतरागाछी येथे तिसर्या दिवशी ०५.१५ वाजता पोहोचेल.
०२४९१ – विशेष अतिजलद (साप्ताहिक) दि. १०.६.२०२१ ते २४.६.२०२१ (३ फे-या) पर्यंत सांतरागाछी येथून दर गुरूवारी २३.२५ वाजता सुटेल व पुणे येथे तिसर्या दिवशी ०९.०५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कोर्ड लाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खडगपूर.
संरचना : १४ शयनयान, ४ द्वितीय आसन श्रेणी.
४. पुणे – हटिया विशेष (साप्ताहिक)
०८६१७ विशेष (साप्ताहिक) दि. ११.६.२०२१ ते २५.६.२०२१ (३ फे-या) पर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून १७.४० वाजता सुटेल व हटिया येथे तिसर्या दिवशी ००.२० वाजता पोहोचेल.
०८६१८ विशेष (साप्ताहिक) दि. ९.६.२०२१ ते २३.६.२०२१ (३ फे-या) पर्यंत दर बुधवारी हटिया येथून २३.५५ वाजता सुटेल व पुणे येथे तिसर्या दिवशी ०९.०५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला.
संरचना : १४ शयनयान, ४ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण :
१) ०२४९१ व ०८६१७ या विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. ९.६.२०२१ रोजी सुरू झालेले आहे.
२) ०१०५७ व ०२०४७ या विशेष ट्रेनचे सामान्य शुल्कासह बुकिंग दि. १०.६.२०२१ रोजी सुरू होईल.
तपशीलवार थांबे आणि वेळांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
वरील बुकिंग सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू असतील.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल असे मध्य रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले आहे.