नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन दिवसात रेल्वेने फुकटया प्रवाशाकडून २ लाख ७८ हजाराचा दंड वसूल केला आहे. १७ व १८ मे रोजी विभागीय रेल्वे प्रबंधक एस.एस.केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वाणिज्य व प्रबंधक (तिकीट तपासणी) आर.डी.क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली टिकिट तपासणी करण्यात आली. त्यात हा दंड वसूल करण्यात आला.
१७ मे रोजी चाळीसगाव – धुळे विभागाला ९ तिकीट तपासणी कर्मचारी आणि २ आरपीएफ कर्मचारी असलेल्या ९६ प्रकरणांमधून ४३ हजार ४३५ चा महसूल प्राप्त झाला. १८ मे रोजी १५ तिकीट तपासणी कर्मचारी आणि स्टेशन आरपीएफ कर्मचारी यांनी भुसावळ स्थानकावर तपासणी केली. त्यांनी भुसावळ स्थानकावर ३१४ प्रकरणे तयार केली आणि २ लाख ३५ हजार ५५० दंड वसूल करण्यात आला.
सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) आर.डी.क्षीरसागर व सहायक वाणिज्य प्रबंधक ( कोचिंग) हे स्वतः दोन दिवस तपासणी करत होते, सोबत विभागीय तिकीट तपासणी निरीक्षक पवार देखील उपस्थित होते. दोन दिवसात या मोहिमेतून २ लाख ७८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.