नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेत (आयआरएमएस) २०२३ वर्षासाठी भर्ती करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यासाठी केन्द्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) नागरी सेवा परिक्षा घेणार आहे. केन्द्रीय लोकसेवा आयोग तसेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाशी विचारविनिमय करुन मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.