सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वर्ष अखेर आढावा: रेल्वेने वर्षभरात या केल्या सुधारणा

by Gautam Sancheti
जानेवारी 2, 2023 | 11:08 am
in राष्ट्रीय
0
railway 1

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वेने आता आधुनिकीकरणाच्या युगात प्रवेश केला आहे. आधुनिक स्थानके, आधुनिक गाड्या निर्माणाची कामे आधुनिक तंत्रज्ञानासह सुरू केली आहेत. भारतीय रेल मार्गावर सध्या सहा आधुनिक वंदे भारत गाड्या धावत आहेत.भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक स्थानांचे दर्शन घडविण्‍यासाठी ‘भारत गौरव’ रेल्वे सुरूआर्थिक वर्ष 22 मध्ये रेल्वेच्या अंदाजपत्रकामध्‍ये 1,90,267 कोटी रूपयांपर्यंत वाढ झाली.ग्राहकांचे अधिकाधिक समाधान मिळावे यासाठी रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास याकडे प्रामुख्‍याने लक्ष केंद्रीत केले आहे.‘एक रेल्वे स्थानक एक उत्पादन’ ही योजना 535 स्थानकांवर लागू करण्यात आली असून, एकूण 572 ‘आउटलेट’ सुरू करण्‍यात आले.वर्ष 2022 मध्ये दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा कॉरिडॉरवर (सुमारे 3000 आर किलोमीटर) ‘कवच’ तैनात करण्यासाठी निविदा मंजूरवर्ष 2022 मध्‍ये , भारतभरातील 21 रेल्वे भरती मंडळांनी (आरआरबीज्) इंडेंटिंग रेल्वे/उत्पादन युनिट्सना सुमारे 14000 उमेदवारांचे पॅनेल पुरवले आहेत. आरआरबी परीक्षांमध्ये प्रथमच आधार आधारित प्रमाणीकरण प्रणाली सुरू करण्यात आली.

प्रवाशांसाठी सुविधा
सेमी-हाय स्पीड वंदे भारत गाड्यांचा समावेश
1) चेन्नई येथील ‘सेमी हाय स्पीड सेल्फ प्रोपेल्ड ट्रेन्स इंटिग्रल कोच’ निर्माण कारखान्यामध्‍ये स्वदेशी तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या रेल गाड्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आता वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहेत.
2) या वेगवान गाड्यांमुळे प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट झाली आहे. या गाड्या कमाल 160 किमी प्रतितास वेगाने धावतात. प्रवाशांना ‘ऑन-बोर्ड इन्फोटेनमेंट’ आणि जीपीएस आधारित प्रवासाविषयीची सर्व माहिती मिळते. स्वयंचलित सरकते दरवाजे, प्रवास अधिक सुखकर व्हावा म्हणून पाय मागे घेता येण्‍यासाठी व्यवस्था, आणि शून्य ‘डिस्चार्ज व्हॅक्यूम’ जैव शौचालये, सीसीटीव्ही कॅमेरे यांच्यासारखी आणि जागतिक मानकांनुसार इतर अत्याधुनिक वैशिष्ट्ये या गाडीमध्‍ये आहेत.

भारतीय रेल्वेच्या सध्‍या सहा वंदे भारत गाड्या पुढील मार्गांवर धवत आहेत:-
• 2019 पासून दोन वंदे भारत गाड्या धावत आहेत – यामध्‍ये नवी दिल्ली ते वाराणसी आणि नवी दिल्ली ते श्री माता वैष्णो देवी कटरा दरम्यान धावत आहेत.
• वंदे भारतच्या तीन नवीन आणि सुधारित आवृत्ती अलिकडच्या काळात तयार करण्‍यात आली आहे. या नवीन गाड्यांमध्‍ये सुक्षेच्या दृष्‍टीने नवीन सुविधा करण्‍यात आल्या आहेत. मुंबई सेंट्रल-गांधी नगर राजधानी, नवी दिल्ली ते अंब अंदौरा आणि चेन्नई-म्हैसूर, नागपूर-बिलासपूर या मार्गांवर गाड्या धावत आहेत.

विस्टाडोम डब्यांचा समावेश
विस्टाडोम कोच म्हणजेच रेल्वे डबे, यांच्या छतावर तसेच दोन्ही बाजूला असलेल्या मोठ्या खिडक्यांवर पारदर्शक काचा बसविण्‍यात आल्या आहेत. त्यामुळे या सर्वबाजूंनी काचांतून सभोवती मनोहर दृश्य प्रवाशांना दिसते. त्यामुळे प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेता येतो.

सुरक्षितता
सुरक्षितता आणि लवचिकता वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (ईआय) ची तरतूद – रेल गाडी प्रत्यक्ष चालवताना डिजिटल तंत्रज्ञानाचे फायदे घेवून, सुरक्षितता वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जात आहे. 2022 मध्ये 480 रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. 30.11.2022 पर्यंत 2837 स्थानकांना ही प्रणाली प्रदान केली आहे. आत्तापर्यंत एकूण 44% मार्गांवर ही प्रणाली बसविली आहे. 1002 मार्गांसह पूर्व रेल्वेच्या हावडा विभागातील बांदेल यार्ड येथे भारतीय रेल्वेमधील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यप्रणाली दि. 30.05.2022 रोजी सुरू करण्यात आली.

अॅटोमेटिक ब्लॉक सिग्नलिंग (एबीएस) – भारतीय रेल्वेच्या सध्याच्या उच्च घनतेच्या मार्गांवर अधिक गाड्या चालवण्याची क्षमता वाढविणे शक्य व्हावे यासाठी स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग हा एक अतिशय परवडणारा उपाय आहे. 2022 मध्ये 305 रेल्वे किमी अंतरावर एबीएस कार्यान्वित करण्यात आले. 30.11.2022 पर्यंत, भारतीय रेल्वेने किमी मार्गावर एबीएस प्रदान केले आहे. ‘रोल आउट मिशन मोड’ मध्ये एबीएसचे काम हाती घेण्याची योजना आहे. ऑटोमॅटिक सिग्नलिंगच्या अंमलबजावणीमुळे, क्षमतेत वाढ होऊन अधिक सेवा देणे शक्य होणार आहे.

कवच – आत्मनिर्भर भारत बनविण्‍याच्या भावनेने, ‘कवच’चा राष्ट्रीय स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली म्हणून स्वीकार केला आहे. भारतीय रेल्वेने दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा कॉरिडॉरवर (सुमारे 300रेल्वे किलो मीटर) कवच तैनात केले आहे. यासाठी 2022 मध्ये निविदा देण्यात आल्या आहेत.

लेव्हल क्रॉसिंग गेट्सचे इंटरलॉकिंग: लेव्हल क्रॉसिंग गेट्सवरील सुरक्षा हा एक प्रमुख चिंतेचा विषय आहे. लेव्हल क्रॉसिंगवर सुरक्षा वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेने 2022 मध्‍ये 317 लेव्हल क्रॉसिंग गेट्सवर सिग्नलसह इंटरलॉकिंग प्रणाली बसवली. 30.11.2022 पर्यंत जवळपास 10986 इंटरलॉकिंगसाठी गेट सिग्नल प्रदान करण्यात आले आहेत.

एक स्थानक एक उत्पादन (ओएसओपी) योजना
केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश देशभरातील रेल्वे स्थानकांवर विक्री केंद्रांच्या तरतुदीद्वारे स्थानिक कारागीर, कुंभार, विणकर/हातमाग विणकर, कारागीर इत्यादींना कौशल्य विकासाद्वारे वाढीव उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे असा आहे. 25.03.2022 रोजी 19 स्थानकांवर 15 दिवसांसाठी पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रायोगिक प्रकल्पांमधून मिळालेल्या अनुभवावर आधारित, ओएसओपी धोरण 20.05.2022 रोजी जारी करण्यात आले.

विशिष्‍ट संकल्पनेवर आधारित भारत गौरव पर्यटन परिक्रमा रेल्वे
भारतीय रेल्वेने भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि गौरवपूर्ण भव्य ऐतिहासिक ठिकाणे दाखवण्यासाठी एका नवीन प्रकारच्या पर्यटनाला म्हणजेच संकल्पनेवर आधारित पर्यटन परिक्रमा रेलगाडी – ‘भारत गौरव’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, देशभरातले सेवा प्रदाते देशाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या समृद्ध खजिन्याचे प्रदर्शन करू शकतील. सेवा प्रदात्यांनी प्रवाशांना भोजन, निवास, वाहतूक, स्थळ पाहणे, सहल मार्गदर्शक- गाईड अशा सर्वसमावेशक सहल सेवा पुरवायच्या आहेत. ही योजना रोजगाराच्या संधी अनेक पटींनी वाढवण्यासाठी मदत करेल.

• पहिली भारत गौरव रेल्वे – ‘शिर्डी यात्रा 14 .06 .2022 रोजी सुरू करण्यात आली.

गती शक्ती विद्यापीठ (जीएसव्ही) विषयी झालेले कार्य
केंद्रीय विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 बरोबरच मंत्रिमंडळाच्या एका सूचनेनुसार, एनआरटीआय, या अभिमत विद्यापीठाचे गति शक्ती विद्यापीठामध्ये (जीएसव्ही) रूपांतरित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाला अंतिम मान्यता देण्यात आली.

आरआरबी म्हणजेच रेल्वे भर्ती मंडळाच्या परीक्षांमध्ये प्रथमच आधार आधारित प्रमाणीकरण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यासाठी एमईआयटीवायने मान्यता दिली आहे. तसेच यासंबंधी राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी युआयडीएआयबरोबर संपर्क साधण्यात आला आहे आणि ‘रेलटेल’ ची एएसए म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही प्रणाली CEN 01/2019 (NTPC) च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांसाठी आणि CEN RRC 01/2019 (स्तर 1) साठी सीबीटीसाठी लागू करण्यात आली आहे. यामुळे आरआरबी परीक्षांमध्ये होणारी तोतयेगिरी दूर करण्यात खूप मदत होईल. आरआरबी सर्व देशाच्या स्तरावर स्पर्धा परीक्षांसाठी आधार आधारित प्रमाणीकरण लागू करण्यात अग्रेसर आहेत.

रोजगार मेळावे:– भारतीय रेल्वेने 22.10.2022 आणि 22.11.2022 रोजी दोन रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले. हे मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले होते. त्यामध्‍ये अनुक्रमे 10,975 आणि 4, 003 उमेदवारांचा डेटा जमा करून तो डीओपीअॅंडटी च्या पोर्टलवर अपलोड केला गेला. तसेच उमेदवारांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईत बुधवारपासून ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन; या भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

Next Post

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय; अध्यक्षपदी विश्वास ठाकूर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

anjali damaniya
महत्त्वाच्या बातम्या

९६ मद्य परवाने नेत्यांची कंपन्यांना?…अंजली दमानिया यांनी शासनाच्या धोरणावर केला हा सवाल

ऑगस्ट 25, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी या अभ्यासू व आक्रमक नेत्याची निवड….मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा

ऑगस्ट 25, 2025
TeamLease Edtech 2
संमिश्र वार्ता

या स्टार्टअप्समध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीच्या संधी: बघा, हा अहवाल

ऑगस्ट 25, 2025
Untitled 43
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली व जाहीर सभा….दिला हा थेट इशारा

ऑगस्ट 25, 2025
rain1
संमिश्र वार्ता

या चार दिवसा दरम्यान मान्सून होणार सक्रिय…बघा, हवामान तज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 24, 2025
image0015VMW e1756058042931
संमिश्र वार्ता

आसामला ६० वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा येथील भूखंड…केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

ऑगस्ट 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक प्रवास टाळावा, जाणून घ्या, सोमवार, २५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 24, 2025
WhatsApp Image 2025 08 24 at 16.34.15 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर शुभारंभ

ऑगस्ट 24, 2025
Next Post
Vishwas Thakur

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय; अध्यक्षपदी विश्वास ठाकूर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011