भुसावळ – मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ३ पूर्णतः आरक्षित अतिजलद विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
१. नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष अतिजलद (वन वे)
01460 विशेष नागपूर येथून दि. ३.५.२०२१ रोजी २३.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसर्या दिवशी १४.१५ वाजता पोहोचेल.
थांबे : वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, दादर.
संरचना : १ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ५ द्वितीय आसन श्रेणी.
२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा विशेष अतिजलद (वन वे)
01325 विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. ४.५.२०२१ रोजी १७.१५ वाजता सुटेल आणि हावडा येथे दुसर्या दिवशी २०.१५ वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, भुसावळ, नागपूर, रायपूर, बिलासपूर, टाटानगर.
संरचना : १ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ५ द्वितीय आसन श्रेणी.
3. पुणे – दानापूर विशेष
01477 सुपरफास्ट विशेष दि. ३.५.२०२१ रोजी पुणे येथून २१.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्या दिवशी ०४.४० वाजता पोहोचेल.
01478 विशेष दि. ५.५.२०२१ रोजी दानापूर येथून सकाळी ०७.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्या दिवशी १६.२० वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी जं., पं. दीन दयाळ उपाध्याय जं., बक्सर, आरा.
संरचना : १८ द्वितीय आसन श्रेणी.