नाशिक – जयनगर पवन एक्स्प्रेसचे ११ डबे लहावित आणि देवळाली दरम्यान आज रविवारी दुपारी सुमारे ३.१० वाजण्याच्या सुमारास रुळावरून घसरले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या अपघातामुळे पंचवटी आणि नंदीग्राम एक्सप्रेस रद्द केल्याची प्राथमिक माहिती आहे. 12109 आणि 12110 ही पंचवटी एक्सप्रेस आहे. तर 11401 ही नंदीग्राम एक्सप्रेस आहे. तर 22221 ही राजधानी एक्सप्रेस, 12261 हा हावडा दुरोंतो आणि 12173 ही उद्योग नगरी एक्सप्रेस दुसऱ्या मार्गाने चालवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या गाड्या रद्द
1) 12109 डाऊन,मुंबई – मनमाड *पंचवटी* सुपरफास्ट एक्स, आज दि.3 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.
2) 12110 अप,मनमाड – मुंबई *पंचवटी* सुपरफास्ट एक्स,ऊद्या दि.4 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.
3) 11401 डाऊन,मुंबई – आदिलाबाद *नंदीग्राम* एक्स, आज दि.3 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.
या गाड्यांचे मार्ग परिवर्तन केले
1) 22221 डाऊन,मुंबई – हजरत निजामुद्दीन *राजधानी* सुपरफास्ट एक्स, आज दि.3 मार्च रोजी *वसई रोड,नंदुरबार,जळगांव* मार्गे वळविण्यात आली आहे.
2) 12261 डाऊन,मुंबई – हावडा *दुरंतो* सुपरफास्ट एक्स, आज दि.3 मार्च रोजी *वसई रोड,नंदुरबार,जळगांव* मार्गे वळविण्यात आली आहे.
3) 12173 डाऊन,लो.टि.टर्मिनस – प्रतापगढ *उद्योगनगरी* सुपरफास्ट एक्स, आज दि.3 मार्च रोजी *लोणावळा,पुणे,दौंड,मनमाड* मार्गे वळविण्यात आली आहे.
Trains Update-3
Due to derailment of 11061 Express near Nashik. pic.twitter.com/3TBf2LbjRL— Central Railway (@Central_Railway) April 3, 2022