मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – भारतीय रेल्वे ही देशातील प्रवाशांची जीवनवाहिनी समजली जाते. देशभरातील अनेक राज्यांमधील लाखो प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हजारो किलोमीटर रेल्वेने सहज प्रवास करू शकतात. परंतु रेल्वे प्रवासात काही वेळा अडचणी देखील येतात. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करताना प्रवाशांना सुखाने झोप घेता येत नाही, तसेच अन्य देखील अडचणी निर्माण झाल्या होत्या. या बाबतची दखल घेत रेल्वे विभागाने काही नवीन नियम तयार केले आहेत. तसेच भारतीय रेल्वे विभागाने ट्रेनमधील प्रवासाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. विशेषत: रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मार्गदर्शक सूचना आहे.
नवीन नियमांनुसार, आता आपल्या आजूबाजूला कोणताही प्रवासी मोबाईलवर मोठ्याने बोलू शकणार नाही. तसेच तो मोठ्या आवाजात संगीत ऐकू शकत नाही. तक्रार आल्यानंतर रेल्वे अशा लोकांवर कारवाई करेल. हे नियम तात्काळ लागू झाले आहेत.
A ) रेल्वे मंत्रालयाचा आदेश जारी :
नव्या नियमांतर्गत प्रवाशांच्या तक्रारीचे निराकरण न झाल्यास. मग त्याची जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांची असेल. रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनला आदेश जारी केले आहेत. नियमांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
B ) प्रवासी तक्रारी करत असत : रेल्वे विभागाच्या म्हणण्यानुसार अनेकदा प्रवासी शेजारील सीटच्या प्रवाशाबद्दल तक्रार करत असत. मोबाईलवर मोठ्याने बोलणे किंवा गाणे यामुळे त्रास होतो. त्याचबरोबर रात्रभर गटबाजी करत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. रात्री दिवे लावण्यावरूनही वाद झाले होते. त्यामुळे प्रवाशांची झोप उडाली होती.
C ) रात्री १० नंतर मार्गदर्शक सूचना :
1. कोणताही प्रवासी मोबाईलवर मोठ्याने बोलणे आणि मोठ्या आवाजात संगीत ऐकू शकत नाही.
2. रात्रीचा दिवा वगळता सर्व दिवे बंद करावे लागतील.
3. ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत बोलता येणार नाही किंवा गप्पा मारता येणार नाही, एखाद्या सहप्रवाशाच्या तक्रारीवरून कारवाई होऊ शकते.
4. चेकिंग कर्मचारी, RPF, इलेक्ट्रिशियन, खानपान कर्मचारी आणि देखभाल कर्मचारी रात्री शांततेने काम करतील.
5. रेल्वे कर्मचारी वृद्ध, अपंग आणि गरजू एकल महिलांना तात्काळ मदत करतील.