नाशिक – विविध शासन निर्णयानुसार अतिदूरच्या म्हणजे कर्जत ते पुणे दरम्यानच्या स्थानकांवरून बृहन्मुबंईतील शासकीय कार्यालयात कर्तव्यासाठी येत असलेल्या अधिकारी तथा कर्मचारी वर्गाला साप्ताहिक अथवा सार्वजनिक सुटीच्या दुस–या दिवशी कार्यालयात उशिरा येण्याची सवलत अटी व शर्तीनुसार १९९३ पासून दिली जाते. पुढे १९९६ साली सदरची सवलत कसारा ते नाशिक स्थानकादरम्यानच्या कर्मचा–यांसाठी देखील लागू करण्यात आली होती. सदर सवलतींचे आता पुर्नविलोकन करण्यात आले असून त्यासंदर्भातील नवा शासन निर्णय दि. २८ डिसेंबर २०२१ रोजी राज्य शासनाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला आहे.