नाशिक – नाशिक जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड सह परिसरातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची , सरकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात होत असलेली गैरसोय लक्षात घेता व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार ना.डॉ.भारती पवार यांचेकडे सातत्याने रेल्वेने नाशिक व मुंबई करिता दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात होत असलेली मागणी पाहता घेता त्याअनुषंगाने दि.१ डिसेंबर २०२१ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री मा.ना.श्री.अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार आज दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. या प्रसंगी नांदगाव, मनमाड व लासलगाव येथील कोरोना काळात बंद करण्यात आलेले रेल्वे थांबे पुर्वरत सुरु करण्याबाबत आग्रही मागणी केली. यामध्ये कोविडपूर्वी नांदगाव येथील लहान पुर्वरत असलेले थांबे कोविड काळात कमी करण्यात आले होते. तसेच कामयानी एक्सप्रेस (11071 व 11072) चा लासलगाव व नांदगाव येथील थांबा पुन्हा सुरू करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवाशांकडून विनंती मागण्या प्राप्त झाल्या होत्या. लासलगाव येथून मोठ्या संख्यने दैनंदिन प्रवासी नाशिक तसेच मुंबई उपनगरात नोकरी धंद्याच्या निमित्ताने प्रवास करतात. त्याचप्रमाणे या मार्गावर गाड्यांची उपलब्धता अतिशय कमी असल्याने परिसरातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे व लोकमान्य टिळक टर्मिनल ते मनमाड जंक्शन दरम्यान धावणारी गोदावरी सुपरफास्ट एक्सप्रेस (12117) व (12118) काही काळापूर्वी बंद करण्यात आली आहे ती पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावी जेणेकरून ह्या गाडीने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळेल. नांदगाव-इगतपुरी-नांदगावसाठी पुन्हा रेल्वे सुरू करण्यात यावी तसेच वरील रेल्वे थांबे तात्काळ निर्गमित करणे संदर्भात ना.डॉ.भारती पवार यांची केद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव याचे सोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.