विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
केंद्र सरकारचे विविध विभाग तसेच अनेक राज्यांत रिक्त जागासाठी भरती झाली आहे. काही सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरी शोधत असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही चांगली संधी आहे. तसेच रेल्वेत ३ हजार पदांची भरती होणार असून त्वरीत अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी १० + २ प्रणाली किंवा त्याच्या समकक्ष अंतर्गत १० वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, त्यांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवाराची वयोमर्यादा १५ वर्षांपेक्षा जास्त आणि २४ वर्षांपेक्षा कमी असावी.
रेल्वे भरती सेल, उत्तर रेल्वेने संस्थेत ३०९३ अप्रेंटिस पदे भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी नोंदणी प्रक्रिया २० सप्टेंबरपासून २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत राहील . उमेदवार RRCNR च्या अधिकृत साइटवर rrcnr.org वर अधिकृत सूचना तपासू शकतात. अतिरिक्त खाजगी सचिव पदासाठी भरती : यूपीएससीने यूपी सचिवालय भरती २०१३ साठी अतिरिक्त खाजगी सचिव (एपीएस) च्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील आमंत्रित केले आहेत. तसेच आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, २०१३ पूर्वी नोंदणी केलेले उमेदवार १३ सप्टेंबर २०२१ ते १२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत भरती प्रक्रियेसाठी पात्र असतील.