भुसावळ – रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावल रेल्वे विभागातुन ३० एप्रिल रोजी ५४ रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले, सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचा-यांचा यथोचित सन्मान व्हर्चेअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमा द्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधी म्हणुन ब-हानपुर,खंडवा, चाळीसगाव, भुसावळ,जलगाव, बडनेरा, नाशिक, इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत. तसेच ऑनलाईन द्वारे त्यांच्या खात्यामध्ये १४ कोटी ३३ लाख रुपये तत्काळ बँकेत वर्ग केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी केले. सेवानिवृत्ती बद्दल कर्मचा-यांना अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित करुन पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी बी एस रामटेके यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील कर्मचारी तसेच सर्व कल्याण निरीक्षक आदिंनी परिश्रम घेतले.